भिगवण पोलीस स्टेशनने केले मयताच्या नातेवाईकाची माहिती देण्याचे आवाहन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 31, 2022

भिगवण पोलीस स्टेशनने केले मयताच्या नातेवाईकाची माहिती देण्याचे आवाहन..

भिगवण पोलीस स्टेशनने केले मयताच्या नातेवाईकाची माहिती देण्याचे आवाहन..                               भिगवण:- भिगवण पोलीस स्टेशन येथे आकस्मित मयत रजि. नंबर. ०१/२०२२, सीआर.पी.सी.१७४ मधील खबर देणार श्री.नानासाहेब हनुमंत वनवे, वय.४०वर्ष, व्यवसाय. शेती/ पोलीस पाटील,रा.मदनवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे यांनी खबर दिली की, दिनांक २३/०१/ २०२२ रोजी सायं १८:१५ वा चे पुर्वी नक्की तारीख वेळ माहीत नाही मौजे मदनवाडी गावचे हृदद्त पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग कमांक.६५ चे पुणे सोलापुर ब्रिजचे खाली सोलापुर लेंथ जवळ, उजनी धरणाचे पाण्यात, ता.इंदापुर, जि.पुणे येथे अनोळखी पुरूष, वय. अंदाजे ४० ते ४५ वर्ष नाव पत्ता माहीत नाही. याची उजनी धरणाचे पाण्यात पोत्यामध्ये मयत बॉडी मिळुन आली आहे.तरी पुढील तजबीज होणेस विनंती आहे. वगैरे मजकुरचे खबरी वरून दिनांक २३ / ०१/ २०२२,रोजी २२:१४ वा अकस्मात मयत दाखल करण्यात आले आहे.तरी याबाबत कोणास काही माहिती असेल व मयताचे वारसाचा शोध लागणे कामी सहकार्य करणेस आम्हाला दिलेल्या मोबाईल नंबरला फोन करण्याचे आवाहन दिलीप पवार- सहा.पोलीस निरीक्षक भिगवण पोलीस स्टेशन यांनी केले. संपर्क नंबर :- भिगवण पोलीस स्टेशन-०२११८/ २४६२३३/सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार मो- ९८५०३०११३३ / सपोनि विनायक दडस पाटील, पोसई मो- ९५७९३००२८२

No comments:

Post a Comment