धक्कादायक..बारामतीत धारधार शस्त्राने डोक्यात,मानेवर व इतरत्र वार करुन त्यास केले ठार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 22, 2024

धक्कादायक..बारामतीत धारधार शस्त्राने डोक्यात,मानेवर व इतरत्र वार करुन त्यास केले ठार..

धक्कादायक..बारामतीत धारधार शस्त्राने डोक्यात,मानेवर व इतरत्र वार करुन त्यास केले ठार..
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं 646/2024 भारतीय न्याय संहिता 103 (1), 61(2), 189(2),189(4),191(2), 191(3),190 नुसार नुकताच गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी  नवनाथ उत्तम चोरमले वय 39 वर्षे, धंदा फोटो ग्राफर रा-अहिल्यादेवी चौक जळोची बारामती यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीचे नाव व पत्ता- 1) जयेश बाळासाहेब माने 2) शुभम गायकवाड 3) करण जाधव 4) अविष गरुड 5) सोमनाथ जाधव 6) भोल्या व इतर सर्व रा बारामती ता बारामती जि पुणे यांच्या वर गुन्हा दाखल केला असून या घटनेत गणेश धुळाबापु वाघमोडे वय 17 वर्षे रा जळोची ता बारामती हा मयत झाला आहे,याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
दि.21/08/2024 रोजी सांयकाळी 05/00 वा चे सुमारास मौजे जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ बारामती चारचाकी इनोव्हा गाडीतुन 1) जयेश बाळासाहेब माने (2) शुभम गायकवाड 3) करण जाधव 4) अविष गरुड (5) सोमनाथ जाधव 6) भोल्या व इतर सर्व रा बारामती यांनी गेले वर्षी टी.सी. कॉलेज येथे माझा भाचा गणेश धुळाबापु वाघमोडे याचे सोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन माझा भाचा गणेश धुळाबापु वाघमोडे वय 17 वर्षे रा जळोची ता बारामती जि पुणे यास कोणत्या तरी धारधार शस्त्राने डोक्यात, मानेवर व इतरत्र वार करुन त्यास जिवे ठार मारण्याचा कट करून जिवे ठार मारले आहे म्हणुन माझी त्यांचे विरुध्द फिर्याद आहे,1 महिन्यात 18 वर्ष पूर्ण होणार होते, स्वतःच्या वाढदिवसाची खरेदी करून घरी निघाला होता.तसेच त्याच्या अनेक गुन्हे दाखल होते अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment