धक्कादायक..बारामतीत टी. सी.कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार..
बारामती:-बारामती विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना गुन्हेगारी मात्र वाढत चाललेली दिसत आहे सर्वात जास्त चोऱ्याचे प्रमाणात वाढ झाली असून त्याच बरोबर महिला अत्याचाराच्या घटना तर आत्ता जीवघेणे हल्ले..नुकताच बारामती शहरातील नामांकित तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय(टी सी कॉलेज मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला भर दिवसा कॉलेज मध्ये गर्दी असताना हा खुनी हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली एक जण पकडला तर इतर पळून गेले, यावेळी सर्वत्र मुलींमुले सैरा भैरा झाली एकच गोंधळ उडाला असल्याचे सांगण्यात येतंय तात्काळ पोलीस अधिकारी व अमूलन्स आली व जखमी विध्यार्थी दवाखान्यात नेण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक नाळे व इतर पोलीस वर्ग यांनी घटनास्थळी भेट दिली व तिथली परिस्थिती कव्हर केली, या भर दिवसा घडलेली खुनी हल्ला हा पूर्वीचा राग डोक्यात ठेवून झाल्याचं कळतंय,बारामती त विद्यार्थी व पालक वर्गात सद्या दहशतीचे वातावरण होऊ पाहतेय की काय असं वाटू लागलेय तीन खासदार, एक उपमुख्यमंत्री असं असताना कायदा सुरक्षा बिघडत चाललली की काय?अशी शंका निर्माण होत आहे.या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी अनेक वेळा टी सी कॉलेज लगत बंद असलेली पोलीस चौकी तात्काळ चालू करण्याची मागणी अनेक वेळा केली आहे.
No comments:
Post a Comment