बारामती वनक्षेत्रामध्ये अवैध कोळसा भटटयांवर कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 3, 2022

बारामती वनक्षेत्रामध्ये अवैध कोळसा भटटयांवर कारवाई..

बारामती वनक्षेत्रामध्ये अवैध कोळसा भटटयांवर कारवाई..
बारामती:- आज दि.२९.६.२०२२ रोजी बारामती वनपरिक्षेत्रामधील मौजे क-हा वागज येथील वनक्षेत्रामध्ये वनपाल बारामती तसेच वनरक्षक बारामती गस्त घालत असताना खाजगी शेतजमिनीमध्ये प्रोसोपिस प्रजातीपासून तयार करणेत आलेला कोळसा हा टेंपो मध्ये भरत असताना जागेवरच पकडून संबंधित
वाहन चालकाकडे कोळसा वहातूकीसाठी लागणारा निर्गत परवाना पास नसलेने त्यांचेविरूध्द भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच महाराष्ट्र वन नियमावली, २०१४ अन्वये वनगुन्हा नोंदवून सदर वाहन जप्त केले.तसेच दिनांक १५/०६/२०२२ रोजी मौजे लोणी भापकर येथील वनक्षेत्रालगत असणाऱ्या खासगी
शेत जमिनीमध्ये विना परवानगी कोळसा भटटया लावून कोळसा तयार करत असताना आढळून
आल्याने वनरक्षक मोरगाव यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच महाराष्ट वन नियमावली, २०१४ अन्वये वनगुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला. सदर वनगुन्हयाबाबत वनविभागाने सदर आरोपींवर दंडात्मक
कारवाई केली. सदरची कारवाई ही श्री. राहूल पाटील, (भा.व.से.), उपवनसंरक्षक, पुणे, श्री. मयूर बोठे,सहा.वनसंरक्षक,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली शुभांगी लोणकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती, वनपाल
हेमंत गोरे, अमोल पाचपुते तसेच वनरक्षक बाळासो गोलांडे व वनमजूर प्रकाश लोंढे यांनी केली.आपणांस वनक्षेत्रामध्ये कुठेही काहीही अवैध काम आढळून आलेस या कार्यालयाचे दुरध्क्मां🎂₹क : 02112-244450 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन शुभांगी लोणकर, वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment