मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात ४ आरोपी अटक, दोन मोटार सायकल जप्त...वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 3, 2022

मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात ४ आरोपी अटक, दोन मोटार सायकल जप्त...वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई...

मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात ४ आरोपी अटक, दोन मोटार सायकल जप्त.
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई...
वडगाव निंबाळकर:- वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजेपुल गावचे हद्दीतुन दोन मोटार सायकली १)बुलेट व पल्सर मोटारसायकली चोरी गेल्या होत्या त्याबाबत वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन गुरन.२५७/२०२२ भा.द.विफलम ३७९ व गुरन २५८/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हे दाखल आहेत चोरीस गेलेली पल्सर मोटार सायकल ही दोन मुले सातारा शहरामध्ये फिरवित असताना सातारा पोलीसांना मिळुन आले तत्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सोमेश्वर येथील मुलांकडून सदरची मोटार सायकल विकत घेतलेचे सांगतिले त्यावरून सातारा पोलीसांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला संपर्क केला असता वडगाव निबाळकर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफने सातारा येथे जावुन सदर दोन आरोपीकडे चौकशी केली असता त्यानी बुलेट मोटार सायकलही घेतली असल्याचे सांगितले त्यांना गाडी देण्याचऱ्या मुलांची
नावे निष्पन्न करून वडगाव निंबाळकर पोलीसानी १) सुरज सुनिल घमंडे व २० वर्षे सावंतवस्ती
वाघळवाडी ता बारामंती जि.पुणे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी बुलेट व पल्सर मोटार सायकल चोरल्याचे कबुल केले व चोरलेल्या मोटार सायकल १) अभिजित
दिपक राउत २) किशोर हनुमत माने ३) शिवराज संतोष फाळके यांना विकलेल्या असल्याचे सांगितले सदर आरोपीकडून १) बुलेट मोटारसायकल १,९०,०००/- रु किंमतीची २) पल्सर मोटार सायकल १,२५,०००/-
किमतीची जप्त करण्यात आलेल्या आहेत.
आरोपी १) किशोर हनुमंत माने वय २० वर्षे रा. तडवळे ता. कोरेगाव जि. सातारा २) शिवराज संतोष फाळके व १९ वर्षे रा पावर हाउस सातारा रोड ता कोरेगाव जि. सातारा ३) अभिजित दिपक राउत वय २० वर्षे रा. आशादपूर ता कोरेगांव जि. सातारा ३) सुरज सुनिल घमंडे वय २० वर्षे रा. सावंतवस्ती वाघळवाडी ता.बारामती जि. पुणे यांना अटक केलेली आहे सदर मोटार सायकली गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.सदरची कारवाई ही मा डॉ अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा श्री मिलिंद मोहीते अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री सोमनाथ तांडे सहा पोलीस निरीक्षक, पो हवालदार रमेश नागटिळक, पोलीस
नाईक नितिन बोराडे, पो को महादेव साळुंके यांचे पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment