बापरे.. गांजासह ८०,५५,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त . - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 14, 2022

बापरे.. गांजासह ८०,५५,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त .

बापरे.. गांजासह ८०,५५,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त .                                                     इंदापूर:- इंदापुर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, पुणे ग्रामीण (LCB) यांनी संयुक्त
कारवाईत टाटा कंपनीची हॅरीहर चार चाकी कारमधुन बेकायदेशिर रित्या २१८ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी घेवुन जात असताना गांजासह टाटा कंपनीची हॅरीहर कार, हुंदाई कंपनीची आय २० कार व अल्टो कार ताब्यात घेवुन सुमारे, ८०,५५,००० /- रू रुपये (ऐंशी लाख पंचावन्न हजार ) किंमतीचा मुद्देमाल
जप्त केला.इंदापुर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त
कारवाईत दि. १४/१०/२०२२ रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार काही लोक एक टाटा कंपनीची हॅरीहर कारमध्ये अंमली पदार्थ ची वाहतुक करून घेवुन जाणार
आहेत अशी माहिती मिळाल्याने पोलीसांनी सरडेवाडी गावच्या हददीत सापळा लावुन
बातमीप्रमाणे खात्री करत असताना एक आय २० व त्याच्या पाठीमागे एक पांढरे रंगाची टाटा
कंपनीची हॅरीहर कार जात असताना पोलीसांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता
सदरची हॅरीहर कार न थांबता पुणे बाजुकडे गेल्याने पोलीसांनी तिचा पाठलाग केला असता
सदरची कार हि मौजे निमगाव केतकी गावच्या हददीत सोनाई डेअरीजवळ ताब्यात घेवुन
चालकाकडे चौकशी केली असता तो प्रथम उडवाडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याचे वाहनाची
पाहणी केली असता सदर कारची डिक्की उघडुन पाहीली असता डिक्कीमध्ये व मधल्या
सिटचे खाली खाकी रंगाचे चिकटपटटीचे आवरण असलेले पॅकेट्स दिसुन आले. सदर
कारमध्ये अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली त्यावेळी सदर कारला बेकायदेशीर रित्या
वाहतुक करण्यासाठी आय २० कार नं. MH-05 CM-8500 व अल्टो कार नं. MH-18 V-365
हि मागे पुढे पायलेटींग करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने कायदेशिर कार्यवाही सुरू करून
वरील दोन्ही  कार ताब्यात घेवुन सदर कार मध्ये मिळुन आलेल्या १) अमिर गुलाब मुलाणी
रा. मळद ता. बारामती जि. पुणे २) प्रकाश राजेंद्र हळदे वय ३७ वर्षे रा सातव शाळेजवळ,
बारामती ता.बारामती जि.पुणे मुळ रा.मुखाई एस टी स्टॅंड जवळ ता. शिरूर जि. पुणे ३) खंडू
अश्रु परखड वय २९ वर्षे रा. पावणे वाडी ता.बारामती जि. पुणे मुळ रा. लोणीपारवड वस्ती ता.जामखेड जि.अहमदनगर ४) रोहन उर्फ फलेसिंग काशीनाथ जगताप वय ३३ वर्षे रा.देसाई इस्टेट, किडा संकुल मागे बारामती मुळ रा. पणदरे कौतुक नगर सावतामाळी मंदिराजवळ ता.बारामती जि.पुणे ५) सुरज भगवान कोकरे वय ३२ वर्षे रा. हनुमंतवाडी, पणदरे, बारामती ता.
चा व्यापार हा ते सदरचा गांजा हा त्यांनी बारामती जि.पुणे इसमान कडे चौकशी केली असता सदरचा गाज्या सर्वजन मिळुन करीत असल्याची कबुली दिली असुन विशाखापट्टणम येथुन विक्रीसाठी आणला आहे. असे सांगीतल्याने कायदेशिर कार्यवाही करून सदरचा अमली पदार्थ चे मोजमाप केले असता एकुन ५४,५५,०००/- रू किं वा खाकी रंगाचे चिकटपटटीचे आवरण असलेले ११० पॅकेट्स उघडुन पाहीले असता त्यामध्ये कॅनाबियस वनस्पतीची पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकीरी रंगाचा असे एकुण २१८ किलो २०० ग्रॅम वजानाचा आमंली पदार्थ व तिन कार सह असा एकुण ८०,५५,०००/- रू किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपी विरूध्द एन.डी. पी. एस. कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही हि मा. डॉ अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहिते अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, बारामती तसेच मा. गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, बारामती तसेच अशोक शेळके पो नि स्था गु अ. शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी, प्रकाश पवार सहा पोलीस निरीक्षक, सपोनि धनवे, सपोनि माने, पो स ई देठे, पो स ई पाडुळे इंदापुर पोलीस स्टेशन, पोसई गणेश जगदाळे (LCB), पोसई अमित सिद पाटिल(LCB), सहा फौजदार बाळासाहेब कारंडे (LCB), सहा फौजदार काशीनाथ राजापुरे(LCB), पो हवा १८५२ ए डी एकशिंगे (LCB), पो हवा २०५७ एस एम आहिवळे (LCB), पो हवा शेळके, पो हवा मोमीन (LCB), पो ना २१९०, एम एन थिगळे (LCB), सहा फौजदार सतिश ढवळे, सहा फौजदार युवराज कदम, पो ना २१४५ बी एम मोहिते, पो ना ५१५ एस बी खान, पो शि २८५६ व्ही यु काळे, पो शि २३७१व्ही एस राखुंडे पो. शि. विशाल चौधर
१५८८, पोशि सुर्यवंशी सर्व इंदापुर पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे.इंदापुर पोलीसांची हि अवैद्य धंदयाविरूध्द् सलग ७ वी सर्वात मोठी कार्यवाही आहे.

No comments:

Post a Comment