*के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल बारामती चा संघ 17 वर्षाखालील डॉजबॉल स्पर्धेकरीता ठरला पात्र* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 30, 2022

*के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल बारामती चा संघ 17 वर्षाखालील डॉजबॉल स्पर्धेकरीता ठरला पात्र*


*के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल बारामती चा संघ 17 वर्षाखालील डॉजबॉल स्पर्धेकरीता ठरला पात्र*

बारामती:- महाराष्ट्र राज्य संचलनालय पुणे जिल्हा पुणे यांच्या वतीने 28 नोव्हंेबर ते 29 नोव्हेंबर या दोन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल क्रिडा स्पर्धा खेड राजगुरूनगर येथे आयोजित केल्या होत्या त्याठिकाणी 17 वर्षे वयोगटामध्ये एकुण 19 संघ सहभागी झाले होते. 
या स्पर्धेमध्ये के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल, बारामती च्या मुलांचा संघ विजयी झाला. या स्पर्धेमध्ये सेमीफायनल चा अत्यंत चुरशीचा सामना तळेगांव (ढमढेरे) या संघासोबत झाला. यामध्ये के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल चा खेळाडू ओम सपकळ याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहचविले. अंतिम सामना गतवर्षीय विजेता संघ शिरूर या संघावर 3 - 12 असा एकतर्फी विजय मिळवत 17 वर्षाखालील जिल्हास्तरीय शाले डॉजबॉल क्रिडा स्पर्धेमधून विभागीय स्तरासाठी कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन इंग्लिश मिडीयम स्कुल, बारामती ची निवड झाली. 
या सर्व खेळाडूंना संस्थेचे संस्थापक मा. श्री. प्रशांत (नाना) सातव तसेच शाळा व्यवस्थापक श्री. सचिन माने सर, मुख्याध्यापिका नाजनीन शेख, क्रिडक इंस्टीट्युटचे प्रमुख विनोद यादव सर व प्रशिक्षक पवन धनकर व महेंद्रकुमार मोल्हारे यांचे वेळोवेळी लाभलेले मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विजयाने संघामधील सर्व विजयी खेळाडूंचे सर्व संचालक मंडळ व बारामती परिसरातून कौतूक होत आहे. 
        

No comments:

Post a Comment