निरोगी जनावरे विक्रीस आणावीत बारामती बाजार समिती तर्फे आवाहन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 27, 2022

निरोगी जनावरे विक्रीस आणावीत बारामती बाजार समिती तर्फे आवाहन...

निरोगी जनावरे विक्रीस आणावीत बारामती बाजार समिती तर्फे आवाहन...                                बारामती:- सर्व शेतकरी व जनावरे व्यापा-यांना कळविणेत येते की, बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील जनावरे बाजार मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचे आदेशा नुसार गुरूवार दि. २९/१२/२०२२ रोजी सुरू होणार आहे. सदर जनावरे बाजार लंम्पी स्कीन प्रादुर्भावामुळे दि. १५/९/२०२२ पासुन बंद होता. सदर जनावरे बाजार दर गुरूवारी जळोची उपबाजार येथे भरवला जातो. तरी सर्व शेतकरी व व्यापा-यांनी जळोची उपबाजार आवारात आपले जनावरे विक्री आणताना लंम्पी आजाराचे प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून जनावरे विक्रीस आणावीत अशी माहिती प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
राज्यात लंम्पी स्कीन प्रादुर्भाव कमी झाल्याने बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीस मा. जिल्हाधिकारी, पुणे यांनी जनावरे बाजार सुरू करणे बाबत आदेश दिले असुन त्यांचे सुचनांचे पालन करून जनावरे बाजार सुरू होणार आहे. तरी सर्व शेतकरी व व्यापा-यांनी पुढील सुचनांचे पालन करून जनावरे विक्रीस आणावीत. जनावरे बाजार आवारात निरोगी जनावरे विक्रीस आणावीत. जनावरांना लंम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण केलेले असावे. जनावरांच्या कानात टॅग नंबर असावा. सर्व शेतक-यांनी/व्यापा-यांनी विहीत नमुन्यातील जनावरांचे आरोग्य दाखला बरोबर आणाने आवश्यक आहे.  तरी शेतकरी व व्यापा-यांनी आपली निरोगी जनावरे विक्रीस आणावीत असे आवाहन बारामती बाजार समिती तर्फे  करणेत येत आहे.

No comments:

Post a Comment