बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गासाठी भूसंपादनातील उर्वरित ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करून अडथळे होणार दूर... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 6, 2022

बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गासाठी भूसंपादनातील उर्वरित ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करून अडथळे होणार दूर...

बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्गासाठी भूसंपादनातील उर्वरित ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करून अडथळे होणार दूर...
 बारामती :-पालखी महामार्गातील जमीन भूसंपादन झाले आत्ता पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना जोडण्यासाठी बारामती-फलटण-लोणंद या ६३.६५ किमी लांबीच्या एकेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला गेला आहे. या प्रकल्पासाठी फलटण, बारामती या तालुक्यांतून १७६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन
करण्यात येत आहे. यापैकी संपादन न झालेल्या ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे दिल्याची माहिती समोर येत आहे. या मार्गासाठी आतापर्यंत १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. एकूण रेल्वेमार्गांपैकी ३७.२० किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील काही गावांमधील खासगी जागा संपादित करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. या मार्गासाठी १७६ हेक्टरपैकी १२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात
आली आहे, तर काही दिवसांत ९.६८ हेक्टर एवढ्या जमिनीची खरेदी होईल. त्यामुळे १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे, असे म्हणता येईल. मात्र,बाकी ४० हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी तेथील नागरिकांकडून विरोध होत असल्यामुळे ही जमीन सक्तीने संपादन करावी लागणार आहे. या सक्तीच्या संपादनासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव दिला आहे. यासाठी त्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली
आहे. या मार्गातील सुमारे साडेसात हेक्टर जमीन ही वनविभागाच्या नावावर आहे. ती संपादन करण्यासाठी वनविभागाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.आता, त्याला मान्यता मिळाली आहे.बारामती-फलटण-लोणंद रेल्वे प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून गेल्या तीन महिन्यांत १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे.मात्र, उर्वरित ४० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात अडथळे येत आहेत.त्यामुळे सक्तीचे संपादन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment