अखिल केशनवनगर रहिवासी संघ यांच्यावतीने सिमेंट कॉकीट रस्ता होणेसाठी 23 मार्चला साखळी उपोषणाचा इशारा.. केशवनगर:- अखिल केशनवनगर रहिवासी संघ यांच्यावतीने सिमेंट कॉकीट रस्ता होणेबाबत निवेदन डॉ. एल.एम. बेंद्रे, पत्रकार व केशवनगर येथील रहिवासी यांनी विविध अधिकारी पदाधिकारी, राजकिय मंडळीना दिले या निवेदनात मागणी केली असून स.नं.६, कुंभारवस्ती, जनावराच्या दवाखान्याच्या मागे, नदी किनारी, शंकर मंदीराजवळ,
स्मशानभुमीशेजारी त्या ठिकाणचा ३७ मीटर रस्ता आजपर्यंत सिमेंट कॉकीटचा बनवणे शिल्लक ठेवलेला आहे. व तो पावसाळयामध्ये कुठलाही जाणेयेणेसाठी रस्ता नाही व
पावसाळयामध्ये त्या ठिकाणी चिखल होते.
तसेच सदर ठिकाणी असलेले खंडोबा देवस्थान ट्रस्ट चे खंडोबाचे मंदीर असुन, सदर
मंदीरामध्य भाविक भक्तांचे येणेजाणे असते. परंतु त्या ठिकाणी कुत्रे आणि इतर प्राणी येवुन घाण करतात, त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जातात. तरी सदर ठिकाणी कंपाउंड चे
काम करणे तसेच इतर डागडुजी करणे हे अतिशय महत्वाचे झाले असुन, त्या ठिकाणी सामाजिक खात्यातुन सदरील काम त्वरीत करण्यात यावे.
रस्ते नसल्यामुळे मनुष्य आजारी पडले तर अॅब्ल्युंस जावु शकत नाही. आग लागली तर फायर ब्रिगेड जावु शकत नाही अशा ठिकाणी रहिवासी राहत असुन सर्व रस्ते या ठिकाणचे झाले आहेत. परंतु सदरचा ३७ मीटर रस्ता का झाला नाही? या ठिकाणी वयस्कर,
स्त्रिया व लहान मुले गेली २० वर्षापासुन राहत आहेत. तरी या बाबत स्थानिक राजयकीय नेत्यांना वेळोवेळी भेटुन पत्रव्यवहार करुन समक्ष शिष्टमंडळासह निवेदन देवुन सुध्दा अद्यापपर्यंत
कुठलीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे सदरचे नागरीक हवालदील झाले आहेत.पावसाळयामध्ये अक्षरश: या ठिकाणचे रहिवासी नातेवाईकाकडे आश्रयाला जातात. तरी शासन व स्थानिक नेते या कडे फक्त आश्वासन देणे एवढेच काम करतात. तरी याकरीता आम्ही दिनांक २५/०३/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळयासमोर पुणे स्टेशन, कलेक्टर ऑफीस समोर साखळी उपोषणाला बसणार आहोत. सर्व नागरीक व बंधु भगिनी तसेच धनगर समाज उन्नती महासंघ यांच्या सहाय्याने, यावेळी साखळी
उपोषणाला बसणार आहोत. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. व प्रत्यक्ष पाहणी करुन गेलेले पी.डब्यलु.डी चे अधिकारी पिएमसी अधिकारी व इतर शासकिय यंत्रणा यांनी का याबाबत निर्णय घेतला नाही हे माहितीच्या अधिकाराखली विचारले असता त्याचे उत्तर अतिशय वेगळे आले आहे. यामुळे नागरीकांचा रोष वाढला आहे. तरी तात्काळ सदर बाबतचा सिमेंट कॉक्रीटचा मजबुत रस्ता करुन मिळावा ही नागरींकांची नम्र विनंती करण्यात आली जर उपोषणासह जरी शासन
दरबारी ऐकत नसतील तर पुढील काळात मा. मुख्यमंत्री महोदय, यांच्या कार्यालयासमोर सर्व
नागरीक सकाळी उपोषणाला बसणार आहेत. तरी संबंधीतांनी याबाबत कुठल्याही प्रकारची
काळजी घेतली नाही तर पुढील येणा-या भावी मतदानावर येथील स्थानिक नागरीक मतदानाला
नोटा ला मतदान करतील. तरी सदर बाबत वेळोवेळी गेली ३५ वर्षापासुन या ठिकाणी स्मशानभुमी
असल्याने रहिवासी वस्ती असुनसुध्दा त्या ठिकाणी जाणेयेणेकरीता नागरीकांना रस्ता नाही. हे
अतिशय गंभीर व क्लेशदायक आहे. याबाबत शासन दरबारी व विरोधी पक्ष नेते यांनी
तात्काळ दखल घ्यावी म्हणुन सर्व नागरीकांनी यापुर्वी मोर्चा भरणे आंदोलन, निवेदन देणे, पत्र देने, व राजकीय नेत्यांना वेळोवेळी भेटुन संपर्क करुन सर्वाजवळ विनंती केली.
तरी आजतागायत पर्यंत त्या ठिकाणी रस्ता मंजुर करण्यात आला नाही. मागिल दोन वर्षापुर्वी
इतर परिसरात व्यवस्थित सिमेंट कॉक्रीटचे रस्ते बनवले आहे. तेंव्हा सदरचा पट्टा हा उपोषीत ठेवला आहे.असे लेखी निवेदनाद्वारे पत्र १. मा. चंद्रकांतदादा पाटील,मा. पालकमंत्री, पुणे शहर
२. मा. अजितदादा पवार,
विरोधी पक्ष नेते म.राज्य
३. मा. अमोल कोल्हे सर
मा. खाजदार, रा.कॉ.पार्टी
४. मा. श्री. चेतन तुपे
आमदार रा. कॉग्रेस
५. मा. पोलिस आयुक्त
पुणे शहर
६. मा. जिल्हाधिकारी पुणे शहर
७. मा. पोलिस निरीक्षक,
पोलिस स्टेशन मुंढवा
८. मा. पोलिस निरीक्षक,
पोलिस स्टेशन बंडगार्डन
९. सर्व संपादक व इलेक्ट्रॉनीक मिडीया
१०.मा.महोदय, श्रमीक पत्रकार संघ, नवी पेठ यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment