विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात...रो. राजेंद्रकुमार सराफ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 7, 2023

विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात...रो. राजेंद्रकुमार सराफ

विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून चांगले काम करु शकतात...रो. राजेंद्रकुमार सराफ

सोमेश्वरनगर: 2 मे आजच्या समाजात पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करु शकतात. शालेय जीवनातच मुलांमध्ये पर्यावरण विषयक सजगता निर्माण झाल्यास  हीच मुले मोठी झाल्यावर पर्यावरण संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे करतील असा विश्वास पर्यावरण अभ्यासक रो. राजेंद्रकुमार सराफ यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ बारामती आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण संवर्धन कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रो. प्रा. डॉ अजय दरेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पर्यावरण समितीच्या डायरेक्टर रो. गौरी शिकारपुर, विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक सचिन पाठक, रो. दर्शना गुजर, रो. अरविंद गरगटे, रोटरी क्लब ऑफ ई डायमंड चे अध्यक्ष रो. प्रकाश सुतार, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष रोट्रॅक्टर आदित्य भावसार, रोट्रॅक्टर आशिष आदी मान्यवर उपस्थित होते.आपले म्हणजे मानवाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपण पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी आहे. आज आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर उद्याच्या पिढीचे भवितव्य धोक्यात येईल म्हणून उद्याच्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण दूत म्हणून प्रभावी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राजेंद्रकुमार सराफ यांनी केले.पर्यावरण अभियंता व चेअरमन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 सपोर्टिंग द एन्व्हायरमेंट, रोटेरियन राजेंद्रकुमार सराफ यांनी विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 300 विद्यार्थ्या करिता एनवायरनमेंट स्टीवर्डशिप पर्यावरणीय कारभारी / दूत कसे व्हायचे यावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
प्रगती, आर्थिक सुबत्ता, राहणीमानातील बदल, शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे संसाधनाचा वापर व प्रदूषणात वाढ झाली आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय कारभारी / दूत ( एन्व्हायरमेंट   स्टीवर्ड)होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रमुख कार्य पर्यावरण शिक्षण, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन, नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर, पर्यावरण निरीक्षण, जैवविविधतेचे रक्षण, परिसंस्था पुनर्संचयित करणे, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणीय प्रचार व तरफदारी आहेत. सामाजिक आणि पर्यावरणीय बदल व संदर्भ वापरून सामाजिक व पर्यावरणीय बदल घडवून आणता येतील. अनेक उदाहरणे देऊन हे कसे सहजपणे करता येईल हे समजावून सांगितले. पर्यावरण शिक्षणासाठी स्थानिक परिसंस्था, हवामान, भूविज्ञान, जलस्त्रोत, व नगर वस्तीचा परिसंस्थेवर परिणाम याचा अभ्यास. नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करण्यासाठी परिसरातील वनस्पती, पशु, पक्षी, कीटक, माती, खडक व खनिजे याची माहिती व संवर्धन. नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर याच्या अंतर्गत मर्यादित संसाधनाचा काळजीपूर्वक वापर, न्याय्य वितरण,  ती काढताना निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास व निर्मित कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट या साठी प्रयत्न करणे. परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी सोपे उपाय आहेत उदाहरणार्थ नगर वस्तीत पक्ष्यासाठी घरटी, बिया जमा करून त्याचे रोप करून लावणे व झाड वाढवणे, मधुमाशी पालन, परदेशी प्रजातीचा नायनाट व स्वदेशी प्रजातींचे संवर्धन इत्यादी. जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी कागद वाचवा झाडे वाचवा, पायी चालणे किव्हा सायकलचा वापर, शून्य कचरा निर्मिती, किटकाना त्रास न देणे व आपल्या परंपरेत असलेले जैवविविधतेचे सन्मान करणारे सण. टूवे चिकटपट्टी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी चीटकावी व त्यावर जमा झालेली धूळ बघा, झाडांच्या पानावर जमा झालेली धूळ, पाऊस किती पडतो, जल स्त्रोताचे पाणी कसे आहे याचे निरीक्षण व अभ्यास. सायकल किवा सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर, पाण्याची बचत, प्लास्टिकचा व रसायनाचा वापर टाळणे. कमीत कमी कचरा निर्मिती असे केल्यास प्रदूषण नियंत्रित करणे शक्य होईल. पर्यावरणीय प्रचार व तरफदारी करण्यासाठी चालता चालता कचरा उचलणे, टेकड्या जल स्त्रोत प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न, ओल्या कचर्या पासून खत निर्मिती इत्यादी. फेर वापर, पुनर्वापर, अपसायकलिंग केल्यास संसाधनाचावापर कमी होऊन प्रदूषण कमी होईल. हे सर्व विद्यार्थ्यांना सहज करणे शक्य आहे.  राजेन्द्रकुमार सराफ यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की ( एन्व्हायरमेंट   स्टीवर्ड) पर्यावरणीय कारभारी / दूत व्हा व इतरा साठी आदर्श व्हा. सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणीय कारभारी / दूत होऊ असा संकल्प सोडला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष प्रा डॉ अजय दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले रोटरी क्लब कायमच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कामे करत असतात.पर्यावरण संवर्धन जागृती हे रोटरीचे जगभर चालणारे प्रभावी काम आहे.अशा कार्यशाळांमधून पर्यावरणाबाबत  संवेदनशील विद्यार्थी निर्माण करण्याचा वसा रोटरी क्लब ऑफ बारामतीने घेतला आहे. कार्यशाळेच्या सुरुवातीला दर्शना गुजर यांनी प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला.
कार्यशाळेच्या शेवटी रोटरी क्लब ऑफ बारामती चे सचिव अरविंद गरगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यशाळेच्या आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ बारामती, रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब ऑफ ई डायमंड, रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंड, रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment