खळबळजनक..कॉन्फरेन्स चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया,बारामती या संस्थेची जागा संस्थेचे विश्वस्त असल्याचे भासवून परस्पर विक्री व डेव्हलपकरीता नोटरी करून दिल्याने गुन्हा दाखल.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 1, 2023

खळबळजनक..कॉन्फरेन्स चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया,बारामती या संस्थेची जागा संस्थेचे विश्वस्त असल्याचे भासवून परस्पर विक्री व डेव्हलपकरीता नोटरी करून दिल्याने गुन्हा दाखल.!

खळबळजनक..कॉन्फरेन्स चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया,बारामती या संस्थेची जागा संस्थेचे विश्वस्त असल्याचे भासवून परस्पर विक्री व डेव्हलपकरीता नोटरी करून दिल्याने गुन्हा दाखल.!
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 656/2023 भा.दं.वि.क. 420,406,34 प्रमाणे नुकताच गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी नितीन पद्माकर पारकर वय 65 वर्षे रा. शाहु हायस्कुलच्या पाठीमागे ख्रिश्चन कॉलनी बारामती ता. बारामती जि.पुणे यांनी 1) शिरीष हरिभाऊ वाघमोडे रा. बोरी ता. इंदापुर जि. पुणे 2) जयप्रकाश रत्नाकर गायकवाड रा. बारामती जि. पुणे 3) - हरिष आबा सातपुते रा. मुंबई 4) स्टिवन जान साठे रा. मुंबई 5) वैभव वसंत पारधे रा.ख्रिश्चन कॉलनी बारामती यांच्या विरोधात तक्रार केली यामध्ये  दि. 18/02/2021 रोजी 2/00 वाजेचे सुमारास ख्रिश्चन कॉलणी बारामती येथील कॉन्फरेन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची जागे संबंधित घडलेल्या घटनेची माहिती फिर्यादी यांनी फिर्याद देऊन केली की, 1) शिरीष हरिभाऊ वाघमोडे रा. बोरी ता. इंदापुर जि. पुणे 2) जयप्रकाश रत्नाकर गायकवाड रा. बारामती जि.पुणे 3) हरिष आबा सातपुते रा. मुंबई 4) स्टिवन जॉन साठे रा. मुंबई या चौघांनी सदरची मालमत्ता ही संस्थेचे विश्वस्त नसताना संस्थेचे विश्वस्त असल्याचे भासवुन विक्रीकरीता व डेव्हलपकरीता इसम नामे वैभव वसंत पारधे रा.ख्रिश्चन कॉलनी बारामती यांना कुलमुत्यारपत्र नोटरी तयार करून संस्थेची 1) श्रीगोंदा ता. श्रीगोदा जि. अहमदनगर येथील गट क्र 1749 क्षेत्र 15 एकर 2) बारामती येथील सिटी सर्वे नं 923 वार्ड नं 3 मधील 657.6 चै. मी 3 ) भिगवण ता. इंदापुर जि. पुणे येथील गट नं 159, 160 मधील 7 एकर क्षेत्र 4) बारामती येथील गट नं 267 चर्च इमारती शेजारी जागा 5) शिर्सुफळ ता. बारामती येथील गट नं 22 क्षेत्र 13.50 आर 6 ) छेडानगर चेंबुर येथील गट नं 100 व 101 यामधील क्षेत्र 993.23 चौ. मी 7) चेंबुर महानगरपालीका हददीतील प्लॅट नं 2 ए क्षेत्र 520 चै. फुट व प्लॅट नं 28 तीसरा मजला क्षेत्र 940 चौ. फुट टेरेससह अर्षी सर्व मालमत्ता लिहुन दिली होती. त्यानंतर मला येथील वैभव वसंत पारधे व इसम नामे सतिश दिगंबर महाले रा. धुळे यांचेमध्ये झालेली नोटरी नं 444/2021 ही माझा भाचा नेल्सन थोरात याने मला दिली त्यावेळी त्यामध्ये वैभव पारधे याने सतिश महाले यांना आमचे संस्थेचे असलेली बारामती,श्रीगोदा, शिसुर्फळ, भिगवण, दौंड, ढोरचे भानगाव, पुणे, इंदापुर, मुबई (छेडानगर) येथील सर्व जागा पैसे घेवुन विकसीत करण्यासाठी देवुन संस्थेची फसवणुक केली आहे. म्हणुन मी सर्व प्रकार संस्थेचे अध्यक्ष व इतर विश्वस्त बाँडी यांना सांगितला. व इसम नामे 1) शिरीष हरिभाऊ वाघमोडे रा. बोरी ता. इंदापुर जि. पुणे 2) जयप्रकाश रत्नाकर गायकवाड रा. बारामती जि.पुणे 3) हरिष आबा सातपुते रा. मुंबई 4) स्टिवन जॉन साठे रा. मुंबई 5) वैभव वसंत पारधे रा. ख्रिश्चन कॉलनी बारामती यांनी कॉन्फरेन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची जागा ही स्वतः संस्थचे विश्वस्त असल्याचे भासवुन इसम नामे सतिश महाले यांचेशी समझोता करारनामा करून एकूण रक्कम 3,40,000/- चे व रोख स्वरूपात घेवुन विक्री करण्याचा प्रयत्न करून संस्थेची फसवणुक केली आहे म्हणून त्या सर्वांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे. सदरची फिर्यादी ही आवक अर्जावरून दाखल करण्यात आली आहे. अमलदार सहा.फोज. जगदाळे यांनी दाखल करून घेतली तर तपास अमलदार एपीआय वाघमारे करीत आहे.

No comments:

Post a Comment