धनगर समाज एसटी आरक्षणासाठी होणार आक्रमक; दहा दिवसात मोठ्या जनआंदोलनाची होणार घोषणा;सकल धनगर समाजाच्या आरक्षण कृती समितीची झाली स्थापना.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 7, 2024

धनगर समाज एसटी आरक्षणासाठी होणार आक्रमक; दहा दिवसात मोठ्या जनआंदोलनाची होणार घोषणा;सकल धनगर समाजाच्या आरक्षण कृती समितीची झाली स्थापना..

धनगर समाज एसटी आरक्षणासाठी होणार आक्रमक; दहा दिवसात मोठ्या जनआंदोलनाची होणार घोषणा;सकल धनगर समाजाच्या आरक्षण कृती समितीची झाली स्थापना..
 बारामती:- धनगर अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी समस्त महाराष्ट्रातील विविध भागात ज्यांनी उपोषण केले होते अशा सर्व उपोषणकर्त्यांचे राज्यव्यापी चिंतन शिबीर काल (५ जानेवारी) बारामती येथे आयोजित करण्यात आले होते. या चिंतन शिबिरामध्ये विविध ठिकाणी उपोषण केलेल्या उपोषणकर्त्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. उपोषणाची कारणे,समाज बांधवांचा मिळालेला पाठिंबा, त्या काळातील आलेले अनुभव कथन करून सरकारने दिलेल्या प्रतिसादाविषयी साधक-बाधक चर्चा झाली.
 सर्वच उपोषणकर्त्यांच्या चर्चेतून समोर आलेले मुद्दे
१)  जनतेतून आरक्षण लढ्यासाठी प्रचंड पाठिंबा आहे. जनमन आरक्षणाच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी तयार आहे.
२) उपोषण काळात सरकारकडून मिळालेला प्रतिसाद मात्र  असमाधानकारक व निराशेचा आहे. चर्चेमध्ये सरकारने कोणत्याही प्रकारचा विश्वासार्ह डायलॉग उपोषणकर्त्यांशी केला नाही. एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी कोणतही ठाम पाऊल सरकारकडून उचललेले दिसत नाही.
३) एसटी आरक्षण अंमलबजावणीची टाळाटाळ करण्यासाठी विकास अश्या विविध मुद्दे समोर आले.

No comments:

Post a Comment