लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशंगाने बारामती येथे सुरक्षेसाठी पोलिसांनी काढला रूट मार्च.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 23, 2024

लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशंगाने बारामती येथे सुरक्षेसाठी पोलिसांनी काढला रूट मार्च..

लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशंगाने बारामती येथे सुरक्षेसाठी पोलिसांनी काढला रूट मार्च..
बारामती;- आज दि.२३/०४/२०२४ रोजी लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशंगाने बारामती येथे सुरक्षेसाठी उपलब्ध झालेले केंदीय औदयोगीक सुरक्षा बल कडील एकुण ०३ कंपनी मधील एकुण २७० पोलीस अधिकारी व जवान यांचे व्दारे मा श्री संजय जाधव अप्पर पोलीस
अधिक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली व डॉ श्री सुदर्शन राठोड
उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बारामती, यांचे नेतृत्वा खाली बारामती शहर
पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि श्री संतोष घोळवे, सपोनि गजानन चेके, पोउपनि
संध्याराणी देशमुख अशा अधिकारी व बारामती शहर पोलीस स्टेशन कडील २० पोलीस अंमलदार अशांचा संयुक्त रूट मार्च काढण्यात आला.सदरचा रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती येथुन सुरू होवुन कदम चौक
गांधी चौक – गुणवडी चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आमराई- मुख्य पोस्ट ऑफीस -इंदापुर चौक-दत्त मंदीर चौक भिगवण चौक पतंगशहा नगर ते द खाईस्ट चर्च मार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती अशा प्रमुख रस्त्या वरून शस्त्र
धारी केंदीय औदयोगीक सुरक्षा बलाचं जवांनांव्दारे संचलन करण्यात आले.
सदर प्रसंगी बारामती शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर बहुसंख्य नागरीकांची गर्दी होवुन
आगामी लोकसभा निवडणुका निर्भिड पणे पार पाडण्यासाठी वातावरण निर्मीती झाली होती.

No comments:

Post a Comment