बापरे.. RTO अधिकाऱ्यानेच दोघांना उडवले;जखमींकडून संताप व्यक्त..
पुणे :-अपघात घडण्याचे प्रकार वाढतच असून नुकताच एका आरटीओ (RTO) अधिकाऱ्यानेच दुचाकीला धडक देऊन केलल्या अपघातात अद्यापही कारवाई न झाल्यानंतर अपघातातील जखमींकडून संताप व्यक्त होत आहे.पुणे सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक देऊन भीषण अपघाताची घटना घडली होती. हिट अँड रन प्रकरण चर्चेत असतानाच, हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी हद्दीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार
समोर आला आहे. कुंजीरवाडी गावातील चौकात बुधवारी 3 जुलै रोजी हा अपघात घडला असून या अपघाताचे cctv फुटेज समोर आले आहे. संभाजी गावडे असं प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव असून
निखिल पवार आणि विकास राठोड असे अपघातात जखमी झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. विशेष बाब म्हणजे संभाजी गावडे यांनी दोन्ही जखमींच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च देण्याचे आमिष दाखवून,अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल होऊ दिला नव्हता. मात्र, दोन्ही रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा खर्च देण्यास साहेबांनी ऐनवेळी हात वर केल्याने, दोन्ही रुग्णांना उपचार संपल्यावरही मागील तीन दिवसापासुन रुग्णालयातच खितपत पडावे लागल्याची माहिती पुढे आली आहे.या अपघातात दोन तरुण जखमी झाले आहेत संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ज्या दिवशी काही रस्ते बंद होते त्याच दिवशी हा अपघात घडल्याची माहिती आहे. संबंधित आर.टी.ओ. आधिकारी हे उरुळी कांचनच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.
आरटीओ अधिकारी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीला या गाडीने जोरात धडक दिली होती. त्यामध्ये, निखिल पवार व विकास राठोड हे दोघेही जखमी झाले असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment