बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मोटारसायकल चोर जेरंबंद त्यांचे कडून दोन मोटारसायकल असा एकुण ५००००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मोटारसायकल चोर जेरंबंद त्यांचे कडून दोन मोटारसायकल असा एकुण ५००००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त

बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मोटारसायकल चोर जेरंबंद त्यांचे कडून दोन मोटारसायकल असा एकुण ५००००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त
बारामती :- शहर पोलीस स्टेशन हददीत गुन्हे शोध पथकाने पेठ्रोलींग दरम्यान मोटारसायकल चोरास पकड़न त्याचेकडे विचारपुस चौकशी केली असता त्याने आपले नाव अमोल दत्तात्रय जगताप रा. साखरवाडी सातसर्कल ता फलटण जि सातारा असलेचे सांगितले सदर आरोपी कडे अधिक विचारपुस चौकशी केली असता त्याने फलटण ग्रामीण पालीस स्टेशन गु.र.नं -२२०/२०२१ भा.द.वी ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील सी डीलक्स मोटारसायकल तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं ३५१/२०२१ भा.द. वी ३७९ याप्रमाणे दाखल गुन्हयतील बजाज कंपनीची प्लॅटीना मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असुन त्याचेकडून एकुण ५०,०००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व बारामती तालुका पोालीस स्टेशन कडील एकुण दोन गुन्हे उघडकीस आनले
सदरची कामगिरी मा.पोालीस अधिक्षक सो श्री अभिनव देशमुख सर,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री .मिलींद मोहीते सो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो, पोलिस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स पो. नि प्रकाश वाघमारे,सहायक फौजदार शिवजी निकम, पोलीस नाईक रूपेश साळुके,पो. का सुहास लाटणे,पो.काँ अकबर
शेख,पो.का तुषार चव्हाण,पो.का दशरथ इंगोले यांनी केली.

No comments:

Post a Comment