विकास धाइंजे व वैभव गिते ही जोडी पुन्हा एकदा राज्यातील गरीब जनतेच्या पाठीशी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

विकास धाइंजे व वैभव गिते ही जोडी पुन्हा एकदा राज्यातील गरीब जनतेच्या पाठीशी..

म्युकरमायकोसीस आजारावर महात्मा जोतिबा फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत मोफत  उपचार होणार....

विकास धाइंजे व वैभव गिते ही जोडी पुन्हा एकदा राज्यातील गरीब जनतेच्या पाठीशी..

मुंबई:- राज्यातील जनता कोरोना कोविड 19 या विषाणूशी लढत असतानाच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराचे संकट जनतेवर येऊन ठेपले आहे.या आजाराचे उपचार व औषधे महागडी असल्याने याचा खर्च सामान्य कुटूंबांना परवडणारा नाही ही गंभीर बाब लक्षात घेऊन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्यमंत्री यांच्याकडे म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराचे महात्मा जोतीबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करावेत म्हणून निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.याची दखल शासनाने घेऊन  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 18 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजारावर उपचार करण्यात येतील.म्युकरमायकोसीस या आजारावरील उपचाराकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत परिशिष्ट अ प्रमाणे सर्जिकल पॅकेज अकरा व मेडिकल पॅकेज उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने मध्ये प्रति कुटुंब प्रतिवर्ष 150000 (दीड लाख रुपये) एवढे विमा संरक्षण आहे तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुद्धा विमा संरक्षण आहे.म्युकरमायकोसीस या आजारावर उपचार करण्याची योजना अंगीकृत रुग्णालयांमध्ये योजना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू आहे.असे शासननिर्णयात नमूद आहे.म्युकरमायकोसीस  (Mucormycosis) या आजाराचा वाढता आकडा पाहून या योजनेची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत किंवा जोपर्यंत कोरोना कोविड संक्रमण देशात आहे तोपर्यंत वाढवावी अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
*राज्यातील जनता महामारीच्या मोठ्या संकटात असताना संकटसमयी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे व राज्य सचिव वैभव गिते ही जोडी जनतेचा आधार म्हणून पुढे आले आहेत*

No comments:

Post a Comment