बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडून विद्युत मोटारी व एक मोटार सायकल चोरी करणारे आरापी जेरबंद करून त्यांचे कडून १०००००/-रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त...
बारामती:- शहर पोलीस स्टेशन गु.र.नं-४७३ / २०२१ भा.द.वी ३७९ प्रमाणे दि.१३/ ०९/२०२१ रोजी दाखल गुन्हयात फिर्यादी नामे लक्ष्मण चंद्रवली चव्हाण यांचे कडील एच एफ डीलक्स काळे रंगाची मोटारसायकल हि कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केलेबाबत तक्रार दिलेनंतर सदर गुन्हयात कोणताही तांत्रिक पुरावा उपलबद्ध नसताना गुप्त माहिती दारामार्फत माहिती काढुन आरोपी नामे १)सुमित राजेंद्र जगताप रा.गोखळी ता.फलटण जि सातारा यास मोठया शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यास अधिक विचारपुस चौकशी केली असता त्याने बारामती शहर पोलीस स्टेशन हददीतुन एक मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली
असुन त्याचेकडुन एकुण ३००००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.तसेच बारामती शहर गु र न ४६९/ २०२१ भा.द.वी ३७९,३४ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेवुन आरोपी नामे १)अभिजित दत्तात्रय कांबळे रा.पाटस बायपास रोड हिंदवी बिग बाजार जवळ ता.बारामती जि पुणे २) अतिश धर्मेद्र खरात रा.ढाकळे ता बारामती जि पुणे ३) राहुल विश्वासस रनदिवे रा.
कसबा बारामती जि पुणे ४) अमित विश्वास रनदिवे रा.कसबा जामदार रोड बारामती जि पुणे यांनी सोबत मिळुन बारामती शहर पोलीस स्टेशन हददीतुन शेतकामातील दोन विदयुत मोटारी तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीतुन एक विद्युत मोटार चोरी केलीची कबुली दिली, बारामती शहर पोलीस स्टेशन कडील एकुण दोन व बारामती तालुका पोलीस स्टेशन कडील एक असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आणले असुन त्याचेकडुन एकुण १,००,०००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख , मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर , पोलीस निरीक्षक श्री
नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे सहायक फौजदार संदिपान माळी, सहायक फौजदार संजय जगदाळे पोलीस हवालदार अभिजित कांबळे,पोलीस नाईक दशरथ कोळेकर,कल्याण खांडेकर, पो.कॉ अकबर शेख, तुषार
चव्हाण, बंडु कोठे, दशरथ इंगोले, अजित राउत,अंकुश दळवी होमगार्ड नेवसे यांनी केली.
No comments:
Post a Comment