जळोची प्राथमिक शाळा लसीकरण केंद्राचे उद्घाटन संपन्न
बारामती : जळोची येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र दिनांक 9/9/2021 रोजी पासून जळोची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.
लसीकरण केंद्राचे उद्घाटन डॉ.सदानंद काळे वैद्यकीय अधीक्षक सिल्वर ज्युबली उपजिल्हा रुग्णालय बारामती यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक अतुल बालगुडे,नगरसेविका आशाताई माने, उपनगराध्यक्ष बा.न.प अभिजीत जाधव,प्रताप पागळे,दिपक मलगुंडे,किशोर मासाळ,श्रीरंग जमदाडे,अँड.अमोल सातकर,शैलेश बगाडे,डाॅ.नवनाथ मलगुंडे,दत्तात्रय माने,सावता गोरे,प्रमोद ढवाण,धनंजय जमदाडे,गणेश पागळे,डाॅ.राजेंद्र चोपडे,डाॅ.संतोष शिंदे उपस्थित होते.
सदर लसीकरण केंद्र जळोची येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे,अजिंक्य सातकर,महेंद्र गोरे यांच्या प्रयत्नातून जळोची ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरु आहे.जळोची परिसरातील नागरिकांसाठी लस उपलब्धतेनुसार लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येत आहे.जळोची परिसरातील 500 नागरिकांनी दिनांक 9/9/2021 व 12/9/2021 रोजीच्या आयोजित सत्रामध्ये लसीकरण करून घेतले आहे.
बारामती शहरातील डाॅ.सदानंद काळे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय बारामती व डाॅ. हेमंत नाझीरकर मुख्य वैद्यकीय अधिकारी बारामती शहर यांच्या सुयोग्य नियोजनातून शहरातील लसीकरण केंद्रासाठी लस पुरवठा केला जातो.
No comments:
Post a Comment