जुनी मोटारसायकल- वाहने खरेदी विक्री करत असताना सावधानता बाळगा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 30, 2021

जुनी मोटारसायकल- वाहने खरेदी विक्री करत असताना सावधानता बाळगा..

*जुनी मोटारसायकल- वाहने खरेदी विक्री करत असताना सावधानता बाळगा..*
                                                   बारामती:-  संपूर्ण पुणे ग्रामिण जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक तसेच वाहन दुरुस्ती  दुकान/गॅरेज मधून वाहन खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून यापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत फरासखाना पोलिस स्टेशन परिसरात बॉम्बस्फोट मध्ये सातारा जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल चा वापर करण्यात आलेला होता व अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सुद्धा चोरीच्या मोटारसायकलींचा सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच याचप्रमाणे अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांकडून चोरीचा मोटारसायकली व इतर लहान मोठ्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्या अनुषंगाने जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असून याबाबत खरेदी-विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसल्याने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता आहे म्हणून  वाहन खरेदी विक्री बाबत योग्य तपशील उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम गुन्हे उघडकीस येणे वर होत आहे यामुळे जुनी वाहने खरेदी विक्री बाबत ची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला असणे आवश्यक आहे, याकरिता *मा. जिल्हाधिकारी सो पुणे यांनी त्यांचे कार्यालयाकडील जा.क्र -पगक/कावि/८१३९/२०२१ दिनांक - २७/१२/२०२१ अन्वये संपूर्ण पुणे जिल्हा ग्रामीण भागात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यवसायिकांनी वाहन खरेदी विक्री संदर्भातील माहिती दर ७ दिवसांनी पोलीस स्टेशनला देणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे.* 
       तरी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत जुन्या मोटारसायकली, वाहने यांची खरेदी विक्री करणारे व्यवसायिक, तसेच वाहने दुरुस्ती व्यवसाय करत असताना त्यांची गॅरेज मधूनच खरेदी विक्री करत असलेल्या व्यवसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी-विक्री होणाऱ्या वाहन बाबतची माहिती (वाहन क्रमांक इंजिन,चेसी क्रमांक, मूळ वाहनमालकाचे नाव मुळगाव तसेच सध्या राहत असलेला संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक,ओळखपत्र वाहनांचे आरसी, टीसी बुक तसेच खरेदी करणाऱ्याचे नाव, मुळगावचा व सध्या राहत असलेले ठिकाण संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक व ओळखपत्र इत्यादी माहिती दर ७ दिवसांनी वाहन खरेदी विक्री केलेल्या वाहनाची गोपनीय शाखा, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे द्यावी.
अन्यथा सदरची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ला न देता पोलीस स्टेशनला सादर न करता व्यवसाय करत असलेबाबतची माहिती मिळाल्यास किंवा निदर्शनास आलेस मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आदेशाचा अवमान केला म्हणून संबंधित दोषी व्यवसायिक यांचे विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि सोमनाथ लांडे यांनी दिलेली आहे.

No comments:

Post a Comment