टपाल विभागाच्या वतीने "सुकन्या साथी अभियान" - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

टपाल विभागाच्या वतीने "सुकन्या साथी अभियान"

टपाल विभागाच्या वतीने "सुकन्या साथी अभियान"                                              बारामती:- टपाल विभागाच्या वतीने भारत सरकारच्या "आझादी का अमत महोत्सव
वर्षार्गत "सुकन्या साथी अभियान" राबविण्यात येत आहे. पुणे ग्रामीण विभागात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळल आहे. ज्या पालकानी अदयाप पर्यंत या योजनेचा लाभ घेतला नाही, अशा पालकांनी लवकरात लवकर नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावून सुकन्या समृध्दी योजनेची खाती उघडावीत, असे आवाहन
बारामती पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर लालासाहेब जाधव यांनी केले आहे.  जास्त मुलीना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या पालकांनी अदयाप पर्यंत या टपाल विभागाच्या वतीने "सुकन्या साथी अभियान" टपाल विभागाच्या वतीने भारत सरकारच्या 'आझादी का अमत महोत्सव वर्षार्गत "सुकन्या साथी अभियान" राबविण्यात येत आहे. पुणे ग्रामीण विभागात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळला आहे."आझादी का अमत महोत्सव अंतर्गत मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या साथी अभियान राबविण्याचा आणि सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलींच्यापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प पुणे ग्रामीण विभागाने केला आहे, अशी माहिती डाक अधिक्षक मा. बी.पी.एरंडे दिली. या अभियाना अंतर्गत घरपोच सेवा देण्याचा व मुलींचे भविष्य निश्चिंत करण्याचा संकल्प पुणे ग्रामीण विभागाने केला आहे. त्यासाठी 9960588699 या मोबाईल नंबर वर आपली विनंती नोंदवावी.वरिल माहिती देताना पुणे ग्रामीण विभागाचे अधिक्षक श्री. बी. पी. एरंडे सर म्हणाले की, "सुकन्या समृध्दी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त आहे. मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम एकरकमी मिळेल तसेच मुलीच्या वयाच्या 18
व्या वर्षी शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढता येवू शकते. या योजनेसाठी सध्या सर्वाधिक 7.6 टक्के व्याज दर आहे. या योजनेसाठी पालकांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, दोन फोटो आणि मुलीच्या जन्मतारखेचा दाखल्याची आवश्यकता आहे. हे खाते सुरवातीला फक्त 250 रुपये भरुन उघडता येते. एका वर्षात कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त दिड लाख रुपये जमा करता येवू शकते. या खात्याची मुदत खाते सूरु केल्यापासून 21 वर्ष आहे. पण यामध्ये रक्कम फक्त 15 वर्षे जमा करावयाची आहे. हि रक्कम तुम्ही भारतातील कोणत्याही टपाल कार्यालयात जमा करु शकता किंवा ऑन लाईन पध्दतीने पोस्ट ऑफिस पेमेंट बॅक दवारे भरु शकता. तसेच सबंधित पालकांना जमा रकमेवर आयकरात सट
देखील मिळेल.या अभियाना अंतर्गत सर्व टपाल कार्यालयातून घरपोच सेवा देवून जास्तीत ताकेजा लाभ घेतला नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रासहित नजीकच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा आपल्या विभागात येणा-या पोस्टमनशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिक्षकांनी केले आहे. तसेच पालकांनी या साठी 9960588699 भ्रमण ध्वनी क्रमांकावर Whats App द्वारे मुलीचे नाव,पालकांचे नाव, पत्ता मोबाईल नंबर पाठवावा. तद्नंतर आपल्या विभागातील पोस्टमन आपल्याशी घरच्या पत्यावर संपर्क साधून आपली कागदपुत्रे, खाते उघडण्याचा अर्ज गोळा करतील. सदर कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये दाखल करुन खाते काढून घरपोच पासबुक पोहोचविण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्याच प्रकारे आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्याची
सुविधा आणि आपल्या पाच वर्षाच्या आतीत बालकांचे मोफत आधार कार्ड काढण्याची सुविधेचा लाभ पण आपणास घरपोच मिळणार आहे. तरी नाकरिकांनी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावी.अशी माहिती लालासाहेब जाधव पोस्टमास्तर बारामती मुख्य डाकघर 413102 यांनी दिली.

No comments:

Post a Comment