साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 31, 2022

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती..

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती..                                                        बारामती:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 1.08.2022रोजी 102 वी जयंती आहे. अण्णाभाऊ साठे हे एक महान लोककवी ,समाज सुधारक, आणि लेखक होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील  वाळवा तालुक्यातील वाटेगाव या  खेडेगावी  झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई असे होते.अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवस शाळेत गेले. नंतर त्या काळामध्ये होणाऱ्या सवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांना शाळा सोडून द्यावी लागली होती.परंतु दीड दिवस अण्णाभाऊ जरी शिकले तरी त्यांनी फार मोठी  साहित्य संपदा लिहिली.  अण्णाभाऊ साठे यांनी  दोन लग्नं केली होती .त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसरी पत्नी जयवंताबाई अशी त्यांची नावे होती.   अण्णाभाऊंना एकूण तीन आपत्ते  होती थोरला मुलगा मधुकर, मधवी शांता, धाकटी शकुंतला ही   अण्णाभाऊ साठे यांची  आपत्ते  होती. अशा प्रकारचे अण्णाभाऊ साठे यांचे कुटुंब होते. मराठी साहित्य विश्वात अण्णाभाऊ साठे  यांनी 35 कादंबरी लिहुन त्या कादंब-या अजरामर केल्या.  त्यामध्ये "फकीरा "नावाची कादंबरी 1959 रोजी अण्णाभाऊ साठे  यांनी लिहिली."फकीरा " कादंबरीच्या 19 आवृत्त्या  प्रकाशित झाल्या होत्या.  1961 मध्ये' फकीरा" या कादंबरीला राज्य सरकारचा   साहित्य क्षेत्रात" उत्कृष्ट कादंबरी"चा साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक कलाकृतीला   मिळाला होता.  अण्णाभाऊ साठे यांच्या लघुकथांचा संग्रह 15 असा होता .त्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अ भारतीय भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर केलं गेलं. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांनी  नाटकं लिहिली  .रशियातील भ्रमती; 12 पटकथा ;मराठी पोवाडा शैलीतील दहा गाणी लिहिली होती.  लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या लिहिल्या.  लोककथात्मक कथा शैलीच्या वापरामुळे आण्णा भाऊ साठे यांच्या लावण्या  लोकांमध्ये त्या वेळी  इतक्या   लोकप्रिय झाल्या  की त्यांची लोकप्रबोधनाच्या  चळवळीची गतीमानता अधिक लोकप्रिय  चळवळ  झाली होती.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भारतरत्न डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार  लेखनीला" फकीरा" ही कादंबरी अर्पण केली होती.लोक शाहिर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समुदायाला पूर्ण भूक मरी पासून वाचवण्यासाठी ग्रामीण रुढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाविरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक" फकीरा "याला या कादंबरीमध्ये चित्रित केले  आहे .नायक आणि त्यांच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिका-यांद्वारे अटक  केली गेली होती आणि त्यांचा छळ केला जातो आणि अखेरीला फकीरास फाशी देऊन ठार केले जाते. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य विश्वात त्यांच्या  मुंबईमधील वास्तव्यात  शहरी समस्या  पर्यायाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला  होत.लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांचे  नाव,  तुकाराम भाऊराव साठे असे होते .त्यांचं गाव पूर्वी कुरुंदवाड संस्थानात होते. अण्णा भाऊंचे वडील भाऊराव साठे  कामावरती जात असल्याने दोघा लहान भावांना सांभाळण्याची जबाबदारी अण्णाभाऊ त्या काळामध्ये करत असत.  म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी   आपल्या वडिलांच्या  आजारपणामुळे वयाच्या 14 व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. त्यावेळी जातीभेद प्रथा मोठ्याप्रमाणात होती. मातंग समाजासाठी वेगळ्या शाळेमध्ये ते दीड दिवस शिकले. दांडपट्टा चालवणे ; जंगलात भटकंती करणे ; कोलांट्या उड्या मारणे ;नदी ओढ्याला पोहायला जाणे , मासेमारी करणे ; शिकार करणे, पक्षाची मैत्री करणे ;जंगलातील पानांफुलांतील फरक शोधणे,असा  अण्णाभाऊंचा  छंद त्या काळात होता. एक दिवस रेड्यांच्या जत्रेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकलं; आणि त्याचा परिणाम अण्णाभाऊ  साठे  यांच्यावर इतका  झाला की त्यांनी भारतीय स्वातंत्र्यालढ्यामध्ये  सहभाग घेतला .मुंबईत आण्णा भाऊ साठे  वास्तव्याला आले केवळ सांगली जिल्ह्यातील  दुष्काळामुळे;आणि मुंबईतील भायखळ्याच्या चांदबीबी चाळीमध्ये ते राहू लागले.त्यावेळी मुंबईतील राजकीय संघटन आणि चित्रपटाकडे ते आकर्षित  झाले होते. कम्युनिस्ट पक्षाचे काम करत असताना त्यांच्या "तुकाराम" नावाचं  आण्णा भाऊ साठे नावात रूपांतर झाले .मुंबईत त्या वेळी  ते पोटासाठी भटकंती करत असताना  आण्णा भाऊ साठे यांनी  कधी कधी घर गडी; बूट पॉलिश करणे, काम करणारा डोरकीपर ,कुत्रा सांभाळणारा, खान कामगार, शिंगरबॉय, कोळसा वाहक, हॉटेल बॉय ,इत्यादी कामे केली .त्या काळात त्यांना चित्रपटाचा सुद्धा छंद लागला होता. आणि त्यामुळे  त्यांनी धंद  जोपासला आणि  ते साक्षर झाले. चित्रपट गृहात  पायऱ्यांवरती बसून आणि दुकानावरील बोटावरील अक्षरे जुळवत; हे सर्व त्यांनी शिक्षण  साकार केले .वयाच्या 17 व्या 18 व्या वर्षी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अण्णाभाऊंवरती आली .त्यांनी गिरणी कामगार म्हणून कामाला सुरुवात केली. कोहिनूर मेल मध्ये नंतर काम  करण्यास सुरुवात केली नंतर मिल मधली नोकरी सुटल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर मोठं  आर्थिक संकट  कोसळले .कुटुंबासह पुन्हा ते मुंबईला आले  .मुंबईवरून  पुन्हा वाटेगावी येऊन राहु  लागले .वाटेगावी  तर ते फार  काळ रमले  नाहीत. व ते त्यांच्या नातेवाईकांच्या तमाशाफडात सुद्धा त्या ठिकाणी ते काही काळ सामील झालेला आपल्याला पाहायला;वाचायला  मिळतात. अण्णाभाऊ साठे क्रांतिकारक लेखक; उत्कृष्ट कवी होते.  पहाडी आवाजात पोवाडे   ते गात असत . भारतीय स्वातंत्र्य लढ्यात  संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामाची  चळवळ; यामध्ये  त्यांना         गुरुजींच्या सोबत  त्यांच्यावर अटक वाॅरन्ट  निघालं  होते.त्यामुळे त्यांना घर सोडावं लागलं. पुढे  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कम्युनिस्ट  कनिष्ठ पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ते आदर्श  काम करू लागले.इ .स.1944 मध्ये अण्णाभाऊंनी लाल बावटा कलाक पथकाची स्थापना केली .त्यामध्ये शाहीर अमर शेख ,शाहीर गव्हाणकर यांच्या सहकार्याने "लाल बावटा कलापथक" सुरुवातीस दलित वस्तीत  सुरूवात केली.  ते कम्युनिस्ट चळवळीत कार्य ते करू लागले. आर.बी. मोरे ,के. एम्. साळवी शंकर पगारे,व  ते येथेच ते लिहायला,वाचायला शिकले . व त्यांनी पहिले गाणं लेबर कॅम  मध्ये  मच्छरावर केले होते . त्यामध्ये त्यांनी" लालबावटा "कलापथकाची स्थापना 1945 च्या दरम्यान  केली होती..अण्णाभाऊंचे  आयुष्य मुंबईत गेलं.  साप्ताहिक  मध्ये वार्ताहरचे काम  सुद्धा त्यांनी केले .1950 ते 1962 हा काळ अण्णाभाऊंच्या साहित्याक्षेत्रातील सुवर्णकाळ होता.मुंबई सरकारने" लालबावटा "कलापथकावर त्या काळात बंदी आणली होती.  तमाशावर बंदी आल्यानंतर आण्णा भाऊ साठे यांनी लोक कलेत तमाशाफडाचे रूपांतर केले.  1961 मध्ये अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते डांगे यांनी  यांनी  "शाहिर" या पुस्तकाचा  गौरव केला. अण्णांच्या "इनामदार "नाटकावर आधारित इंडियन पीपल थिएटर असोसिएशन इफ्ता च्या बलराज सहानी यांनी   त्यावेळी पुढाकार घेतला .त्या नाटकात ए.के. हंगल  यांच्या पुढाकाराने   काम मिळाले होते. त्यामुळे नंतर इप्टाचे अण्णाभाऊ नंतर अध्यक्ष झाले.त्यातून त्यांनी  तमाशा या महाराष्ट्रातील लोककलेचा आकृतीबंध स्वीकारला. तमाशातील पारंपारिक सादरीकरणातील गणगवळण बतावणी आणि वग यापैकी गण बतावणी वगनाट्य अण्णाभाऊंनी स्वीकारली.तसेच वगनाट्ये लिहिली.  "अकलेची गोष्ट "शेठजीचे इलेक्शन"  "माझी  मुंबई"  "मूक मिरवणूक" "मुखमंत्राचा दौरा" "खापऱ्या चोर"'बिलंदर बुडवे" अशी वगनाट्य अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लिहिली.  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ती वगनाट्ये खुप  गांजली.अण्णाभाऊंनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड लावणीचा प्रकार म्हणजे "माझी मैना गावाकडे राहिली "ही काव्यरचना होय. त्यांनी लिहिलेली ही  काव्यरचना अविस्मरणीय ठरली. मराठी साहित्य  संमेलनाचे 1958 मध्ये लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे उद्घाटक अध्यक्ष होते .अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या ;तेरा कथा संग्रह ;आठ पटकथा; एक प्रवास वर्णन ,तीन नाटके; 10 पोवाडे ,14 लोकनाट्ये, बारा उपवासात्मक लेख,असे यांनी  विपुल लेखन केले. चिनी जणांची मुक्ती सेवाअंतरगत   चिनी क्रांती वरील गीत  आणि" जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव" हे आंबेडकरावरचं वरील गाणं त्या काळी खूपच गाजले होते.   मराठीतील ग्रामीण प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णाभाऊंचं हे प्रभूत्व  होतं. अण्णां भाऊ साठे याच्या  साहित्य जगतातील 27 भाषांत त्यांचं हे लेखन प्रकाशित झालेले आहे. रशियन ; पोर्तुगीज फ्रेंच ;इत्यादी भाषेत आण्णा भाऊ साठे यांचे लेखन विपुल  होते. रशियातील कलावंत अँगले हे आण्णा  भाऊ साठेंचे  मित्र होते  . म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे  जीवन हे अतिशय कष्टामध्ये गेले होते. 

हे  आपल्याला पाहायला मिळते . राजकारणामध्ये अण्णाभाऊ साठे पहिल्यांदा कमिस्ट विचारसरणीने प्रभावी झाले.डी एन गव्हाणकर ;अमर शेख अशा नाट्यदिग्दर्शकाचे सोबत "लाल बावटा "कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी तमाशा नाट्यप्रसाराचा सदस्य म्हणून  काम  केले.  स्वातंत्र्यानंतरच्या १९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना  घडली होती .म्हणून भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयाचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि या मोर्चातील घोषणा होती ही"ये  आजादी झुटी है' देश की जनता भुकी है" इंडियन पीपल थिएटर असोसिएशन मध्ये एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व  म्हणून  आण्णा भाऊ साठे यांच्या  नावाचा दबदबा होता.भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सांस्कृतिक शाखा त्या काळात होती. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी भाषिक विभागातून वेगळे मराठी भाषा राज्य बॉम्बे राज्य निर्माण करण्याची मागणी त्यावेळी यांना मागणी केली अण्णाभाऊ साठे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरून दलित कार्याकडे ते वळले दलित कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रगट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला . 1958 मध्ये मुंबईमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की "पृथ्वीही शेषनागाच्या मस्तकावर ठरलेली नसूनही दलित कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. त्यातून  केलेलं  कार्याची दखल अकादमीच्या वतीने घेतली  गेली आहे  .पण या काळातील बहुतांशी दलित लेखकाच्या विपरीत आण्णा भाऊ साठेचे कार्य हे बौद्ध धम्मा ऐवजी मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होतं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.  नाही म्हणून दलित लेखकांना सध्याच्या संसारिक हिंदू अत्याचारापासून दलितांना मुक्त करून आणि त्यांना संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती म्हणून आण्णा भाऊ साठे हे  दलित समाजाची विशेषता मातंग समाजाच्या जातीची प्रतीक जरी असले तरी अण्णाभाऊ साठे यांच्या वरती एक आदर्श 2001 रोजी भारतीय पोस्टाने विशेष चार टपाल तिकिटाचे उद्घाटन केले .
.पुण्यातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्ला मधील उड्डाणपूल  इमारतींना सुधारणा  नाही आण्णा भाऊ साठे यांचे नाव दिलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून अण्णाभाऊ साठे महान साहित्यक होत. बोधिवृक्षाखाली राजपुत्र सिद्धार्थ यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि सिद्धार्थ हे गौतम बुद्ध झाले भांबनाथाच्या डोंगरावर तुकारामाला ज्ञानप्राप्ती झाली आणि संसारी तुकाराम "संत तुकाराम झाले" या विद्रोही संतांनी टाळ कुटता कुटता तत्कालीन बहुजन समाजाची टाळकी कुटण्याचे सुद्धा क्रांतिकारी कार्य केले आहे.  म्हणून याच तुकारामाचे नाव धारण करून अण्णाभाऊ साठे जन्माला आले. गाव कुसाबाहेर जन्म झाल्यामुळे अण्णाभाऊंना विषमतावादी समाज रचनेची जाणीव त्यांच्या कठिण प्रसंगातून झाली आणि चार भिंतीच्या कोणत्याही बंदिस्त शाळेची पायरी न चढता चार भिंतीबाहेरच्या जगाच्या उघड्या शाळेत अण्णाभाऊंनी अनुभवाची पाठ गिरवले. पुस्तकाप्रमाणे माणसं वाचली बहुजनाच्या व्यथा वेदनेची जीवन  गाथा हीत्यांनी लिहिली. बहुजन स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या सैन्यातील धाडसी लढाई क्रांतिकारक बंडखोर मातंग वीर पुरुषांना इनामी त्या वेळी दिल्या.  मानाचे फेटे ,मानाच्या तलवारी भेट देऊन राऊत नाईक मोठ्या प्रमाणावर भरती करायचे ठरवले होते.  शिवाजी महाराजांनी सर्वांचे सन्मान केले अण्णाभाऊ साठे हे एक महान साहित्यिक निर्माण झाले गेले. अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती आहे महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सभा व्याख्याने आयोजित केलेले आहेत दोन वर्षानंतर प्रथम जयंती साजरी होत आहे .कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी साध्या पद्धतीने घरगुती पद्धतीने जयंती साजरी केली परंतु मी या लेखाच्या द्वारे असं सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठेंचा विचार आणि साहित्य कार्य समाजाला समजून देण्याची सध्या नितांत गरज निर्माण झालेली आहे .अण्णाभाऊ साठे यांच्या कथा; कादंब-या  शाहिरी पोवाड्याचा अभ्यास ;आज सर्वांनी नितांत करणे गरजेचे आहे. आज जर आपण पाहिलं तर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन आणि प्रवास आणि कौटुंबिक जीवन यांचा जर अभ्यास केला तर गरिबीचे जबरदस्त चटका सहन केलेले एक थोर विचारवंत आणि संशोधक लेखक समाज सुधारक व अण्णाभाऊ साठे जन्माला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे फार मोठे त्यांनी योगदान दिलं .त्या  काळी लेखकाच्या मनात अण्णाभाऊंच्या बद्दल काय होतं काय नाही याची काळजी करण्याची आवश्यकता नाही परंतु अण्णाभाऊ साठे एक दीड दिवस शिकलेली एवढी मोठी व्यक्ती मराठी साहित्याच्या प्रांतामध्ये एवढं मोठं द्वितीय साहित्याच्या क्षेत्रातलं दीड दिवस शिकलेले कार्य करू शकते म्हणून केंद्र सरकारच्या वतीने 102 व्या जयंतीच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार साहित्य क्षेत्रातील अद्वितीय कार्याबद्दल देणं गरजेचं असल्याचं माझं प्रमाणिकपणे आहे .अण्णाभाऊ साठे हे साहित्यिकांचे साहित्यिक होते. साहित्यिक रंगमंचावर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन क्षेत्रातील नवप्रवृत्तीचा  बाज मांडणी केली होती.  त्यांच्या  काव्यासारख्या प्रकारात या काळामध्ये काव्य करणे एक साधना होती.  प्रेमविरह; निसर्ग हे त्यांच्या  काव्याचा विषय होता. ;इतिहासात त्यांच्या कुठलाही विषय असला तरी त्याची काव्यवृत्ती प्रकट होत असेल आणि म्हणून प्राचीन वारसा संत कवीचा जरी आपल्या महाराष्ट्रात असला त्यांना आण्णा  भाऊ साठे समताधिष्ठीत विचाराचे  होत. चालताना जसं असंख्य पानावर  दवाबिंदू पडावे तसे अण्णाभाऊंच कार्य होते. सर्व दवबिंदू एकत्र करून एखादा महासागर निर्माण होऊ शकेल एवढा मोठी काव्य पंक्तित त्यांच्या कठिण प्रसंगातून बाहेर पडली.. " माझी  मैना गावावर राहिली ,
माझ्या जीवाची होतीया काहिली "ही
 त्यांची लावणी 1948 ला  प्रकाशित करण्यात आली.      त्यावेळी अण्णाभाऊंचं वय तिषीच्या हात होतं .साहित्यातील  त्यावेळी सूर्यासारखे तळपणारे प्र.के अत्रे यांनी माझी मैना गावावर राहिली   लावणी ऐकून आनंदाने 
अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला वीर लहुजी वस्ताद यांच्या कु-हाडीची धार होती, फकीराच्या तलवारीची चमक होती, महात्मा फुले यांच्या आसुडाची धग होती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीची आग होती अण्णाभाऊ साठे यांची लेखणी ही संत गाडगेबाबांनी थोतांडशाहीवर उगारलेल्या सोट्याची ती वारसदार होती आज 1 ऑगस्ट २०२२ अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती आहे अण्णाभाऊ साठे यांच्या रोमांचक जीवनातून   आपणास प्रेरणा मिळते यात तिळमात्र  मात्र शंका नाही बोधीवृक्षाखाली राजपुत्र सिद्धार्थ यांना ज्ञान प्राप्ती झाली सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले ; भांबनाथाच्या डोंगरावरावर तुकारामाला ज्ञानप्राप्ती झाली आणि संसारी तुकाराम संत तुकाराम झाले या विद्रोही संतांनी टाळ कुटता कुटता बहुजन समाजाची टाळकी कुटण्याचे क्रांतिकारक कार्य केलं याच तुकारामच नाव धारण करून अण्णाभाऊ साठे जन्माला आले गाव कुसाबाहेर जन्म झाल्यामुळे अण्णाभाऊंना विषमतावादी समाजाची जाणीव झाली आणि चार भिंतीच्या कोणत्याही बंदिस्त शेळीची पायरी न चढता चार भिंतीवरच्या जगाच्या उड्या शाळेत अण्णाभाऊंनी अनुभवाची पाठ गिरवले. पुस्तकाप्रमाणे माणसं वाचली आणि बहुजनाच्या व्यथा वेदनेची बहुजन गाथा त्यांनी लिहिली .आज लोकशाहिर आण्णा भाऊ साठे याच्या 102व्या  जयंती दिना निमित्त राज्य सरकार  व केंद्र सरकारला माझी विनंती आहे की आण्णा भाऊ साठे यांच्या  साहित्यातील अद्वैतीय योगदानाबद्दल त्यांना भारत रत्न  पुरस्कार प्रदान करण्यात यावा. लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या 102व्या जयंती दिना निमित्त विनम्र अभिवादन 
 प्रा.गोरखसाठे सर,
बारामती;जळोची 
मो.9833661268

No comments:

Post a Comment