महिलेने केलेल्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील माजी सरपंच व उपसरपंचावर सावकारकीचा गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 19, 2022

महिलेने केलेल्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील माजी सरपंच व उपसरपंचावर सावकारकीचा गुन्हा दाखल...

महिलेने केलेल्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील माजी सरपंच व उपसरपंचावर सावकारकीचा गुन्हा दाखल...
 बारामती :- सावकारी वाढत असून यावर चाप कधी बसणार अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच सावकारकीचा परवाना नसताना भिमाजी भंडारे, शिर्सुफळचे माजी सरपंच अतुल हिवरकर, शिर्सुफळचे माजी उपसरपंच विश्वास आटोळे, संजय निंबाळकर, ऋतुजा ढवाण यांच्यावर बारामती तालुका पोलीस स्टेशनला
गु.र.नं.539/2022 अन्वये भा.द.वि. कलम 506,34 महाराष्ट्र सावकारीचे अधिनियम 2014 चे कलम 39,45 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी श्रीमती भारती संभाजी जाधव (वय 40 वर्षे, रा. काटेवाडी,ता.बारामती, सध्या रा. तांबेनगर, बारामती) यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार वरील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत हकीकत अशी की, वरील आरोपी भिमाजी भिकाजी भंडारे (रा.भंडारेवस्ती एरंडोली, अहमदनगर ) विश्वास आटोळे, अतुल हिवरकर (दोघे रा. शिर्सुफळ ता. बारामती) संजय निंबाळकर(रा. लासुर्णे ता. इंदापुर) ऋतुजा ढवाण (रा. कसबा बारामती) यांनी संगनमत करून त्यांचेकडे सावकारी करणेचा परवाना नसतानाही
फिर्यादी महिलेला व्याजाने दिलेल्या पैशापोटी फिर्यादीला वेळोवेळी धमकावुन तसेच मानसिक त्रास देवुन फिर्यादीला मौजे गाव रूई
बारामती एम.आय.डी.सी. बारामती येथे असलेला प्लॉट नं. 56 सुयश सहकारी गृह रचना संस्था मर्या. एम. आय. डी. सी. बारामती जि.पुणे या ठिकाणी असलेला रो-हाउस नं. 11 हा दस्त करून भिमराव भंडारे यांचे नावे करून घेतला आहे.सदर प्रकरणाचा तपास सपोनि विधाते करीत आहेत.

No comments:

Post a Comment