बारामती तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी खंडाळे यांची निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 5, 2022

बारामती तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी खंडाळे यांची निवड..

बारामती तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी खंडाळे यांची निवड..
बारामती:- बारामती तालुका कोतवाल संघटना,बारामती तालुका तलाठी संघटना,
बारामती महसूल कर्मचारी संघटना, यांच्या वतीने
कोतवाल सेवा कालावधी नंतर आयुष्यातील
महत्वाचा पदोन्नती चा टप्पा गाठणारे आपले
कोतवाल बंधू संतोष खोमणे, दीपक गायकवाड, सतिश मलगुंडे, रामदास खोत, महेश गोरे, ज्ञानदेव बनकर यांचा यथोचित सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मंडलअधिकारी एल.एस.मुळे,तलाठी संघटना अध्यक्ष रवी कदम, सचिव गजानन पारवे, महसूल संघटना अध्यक्ष मधुकर जाधव, तलाठी संघटना सदस्य विनोद धापटे,राहुल गुळवे व तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव हजर होते. यावेळी बारामती तालुका संघटना नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.ते पुढीलप्रमाणे अध्यक्ष - शेखर हिरामण खंडाळे,उपाध्यक्ष- सोमनाथ हनुमंत भोसले,खजिनदार – महादेव बबन आंबुरे,सचिव - मोहन जगन्नाथ भिसे,कार्याध्यक्ष - पांचाली जगताप सह कार्याध्यक्ष - वर्षा प्रदीप गावडे,ज्येष्ठ सल्लागार - तानाजी आत्माराम जाधव, संपत भाऊसो खोमणे,कार्यकारिणी सदस्य–राहुल हरिश्चंद्र पोमणे,बाळासो अंकुश खोमणे, अनिता राजकुमार जाधव, शिवदत्त बाळासो चव्हाण, सचिन बाळासो निकम,हनुमंत जगन्नाथ थोरात, अक्षदा शैलेश नेवसे.मावळते अध्यक्ष श्री. संतोष दशरथ खोमणे यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नूतन अध्यक्ष श्री. शेखर खंडाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व कोतवाल बांधवांना एकत्रित घेवून अडी अडचणी सोडवण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्याचे
आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment