बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाचे आवकेत वाढ.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 5, 2022

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाचे आवकेत वाढ..

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाचे आवकेत वाढ..

बारामती:-  कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड मध्ये दर बुधवार आणि  शनिवार या दिवशी कापसाचे लिलाव सुरू झाले आहेत. शनिवार ५ नोव्हेंबर २०२२ रोजी  आवारात १०० क्विंटलची आवक होऊन कापसाला प्रति क्विंटल रू. ७९०१/- असा दर मिळावा तर सरासरी रू.७८००/- चा दर मिळाला. स्वच्छ व निवडुन आणलेल्या चांगल्या कापसाला जादा दर मिळत असल्याने आवकेत वाढ होत आहे. यापुढे आवकेत वाढ झाल्यास बाहेरील पेठेतील खरेदीदार येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप व प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी सांगितले.  
कापुस हे नगदी पिक असुन हमखास उत्पन्न देणारे असल्याने बारामती, फलटण तसेच आसपासचे तालुक्यात कापसाचे लागवडीत वाढ होत आहे. कापसाची मागणी ,पुरवठा आणि दराची सध्याची परिस्थिती लक्षात घेता भविष्यात शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. यासाठी बाजार आवारात शेतकरी व व्यापा-यां साठी याबाबत विविध सुविधा पुरविणेचा समितीचा मानस आहे. यापुढे बारामती बाजार समिती मध्ये कापुस मार्केट विकसित होणेसाठी आडते, व्यापारी व बाजार समिती प्रयत्नशील राहणार आहे. कापसाची उघड लिलावात विक्री तसेच अचुक वजनमाप आणि त्याच दिवशी पेमेंट असा बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे नावलौकिक आहे. त्यामुळे परस्पर व्यापा-यांना कापुस विक्री करणे ऐवजी शेतक-यांनी मार्केट मध्ये कापुस विक्रीस आणावा असे आव्हान बाजार समिती तर्फे करणेत येत आहे.

No comments:

Post a Comment