बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती; कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास ३० एप्रिल पर्यन्त मुदतवाढ... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 25, 2023

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती; कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास ३० एप्रिल पर्यन्त मुदतवाढ...

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती; कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास ३० एप्रिल पर्यन्त मुदतवाढ...
बारामती:- राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि. १ फेब्रुवारी २०२३  ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतक-यांना रू. ३५०/- प्रति क्विंटल प्रमाणे व जास्तीत जास्त २०० क्विंटल पर्यन्त प्रति शेतकरी यानुसार अनुदान मंजुर करणेचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 
सदर निर्णयानुसार बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये वरील कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतक-यांनी कांदा अनुदान मिळणे करिता अर्ज करणेची  मुदत २० एप्रिल पर्यन्त होती. परंतु शासनाचे  फेर निर्णयानुसार आता अर्ज करणेची मुदत ३० एप्रिल २०२३ पर्यन्त वाढविणेत आली आहे. ज्या शेतक-यांनी अद्याप अर्ज जमा केलेले नाहीत अशा शेतक-यांनी  ३० एप्रिल २०२३ पर्यन्त  खालील नमुद अटी नुसार जळोची उपबाजार भाजी मार्केट येथे सकाळी ८ ते  दुपारी २  वाजे पर्यन्त अर्जासह प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी केले.
१.  शेतकरी मागणी अर्ज -नमुना बाजार समिती मध्ये उपलब्ध.
२. कांदा विक्री केलेली मुळ पट्टी
३. कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा मुळ  प्रत
४. आधार कार्ड ( स्वत: प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत )
५. बचत खात्याची बँकेची पासबुक झेरॉक्स प्रत  स्पष्ट दिसेल अशी 

टिप-   १) ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांचे नावे व विक्री पट्टी मुलाच्या नावे व अन्य कुटुंबाचे नाव आहे  आणि ७/१२ खरीप कांदा अशी उता-यावर पिकपाणी नोंद आहे अशा प्रकरणात वडील, मुलगा व अन्य कुटुंबीयांनी सहमती पत्र/ शपथ पत्र सादर करावयाचे आहे. त्याचा नमुना बाजार समितीकडे आहे.  ७/१२ उतारा ज्या नावे असेल त्यांचे बँक खाते मध्ये अनुदान जमा होणार आहे. 
२) हस्ताक्षरात लिहीलेला ७/१२ उतारा ज्या शेतक-यांनी जोडला आहे. त्यांनी त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषि पर्यवेक्षक यांचे समितीकडुन कांदा पिक घेतले बाबत शिफारस घेऊन बाजार समितीकडे दाखल करावी लागेल.

No comments:

Post a Comment