बापरे.. या अवस्थेत पोलिसाने उगारली भर रस्त्यात तलवार, परिसरात दहशत माजवल्याने तडकाफडकी निलंबित... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 25, 2023

बापरे.. या अवस्थेत पोलिसाने उगारली भर रस्त्यात तलवार, परिसरात दहशत माजवल्याने तडकाफडकी निलंबित...

बापरे.. या अवस्थेत पोलिसाने उगारली भर रस्त्यात तलवार, परिसरात दहशत माजवल्याने तडकाफडकी निलंबित...
पुणे : - पोलिसाला बेकायदा शस्त्र बाळगणे,सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी की,    मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने  भर रस्त्यात तलवार उगारून
दहशत  माजवल्याची घटना घडली आहे. ही घटना विश्रांतवाडी भागात घडली असून तलवार उगारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर  यांनी दिले आहेत.
याबाबत पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विश्रांतवाडी
पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जाधव मुंढवा वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत पसरवत असल्याची
माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जाधव
याला ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत जाधव मुंढवा वाहतूक शाखेत पोलीस कर्मचारी असल्याचे उघडकीस आले.जाधव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे,सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव याची चौकशी करण्यात आली.जाधव याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले.

No comments:

Post a Comment