जिवे ठार मारण्याच्या उददेशाने तलावात छातीवर व दोन्ही पायाला रस्सीच्या साहयाने दगड बांधून पाण्यात टाकुन खून..पोलिसांचे संपर्क करण्याचे आवाहन.
बारामती:- बारामती तालुका पोलीस स्टेशन पुणे ग्रा.३१० / २०२३ भादवि कलम ३०२, २०१
तपासी अंमलदार श्री आर जे घुगे सहा. पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन व फिर्यादी दत्तात्रय भानुदास लेंडवे पोलीस उपनिरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या दाखल फिर्यादी नुसार अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे ३० ते ४० वर्षे
मयत व्यक्ती ता. २५/५/२०२३ रोजी १२/०० वाचे पुर्वी मौजे शिर्सुफळ ता बारामती जि पुणे येथील पाण्याचे तलावात ता. २६/५/२०२३ रोजी १२:४१ वा.अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळले सदर मयताच्या मानेस गोलाकार पिवळे नायलॉनच्या दोरीने, छातीवर व दोन्ही पायाच्या पिंडरीला पिवळया पांढ-या रंगाच्या नायलॉन दोरीच्या,तारेच्या साहयाने दगड बांधलेला दिसत आहे.मयताच्या नेसणीस व अंडरवियर दिसत असून मयताचे डोळे, जिभ बाहेर आलेली दिसत आहे.मयताचा चेहरा व जिभ काळी पडलेली दिसत आहे.वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाने जिवे ठार मारण्याच्या उददेशाने मौजे शिर्सुफळ ता. बारामती जि पुणे येथील तलावात छातीवर व दोन्ही पायाला रस्सीच्या साहयाने दगड बांधून पाण्यात टाकुन खून केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.वरील प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयामधील मयत व्यक्तीची ओळख आपआपले पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांमार्फत होणेस विनंती असल्याचे सांगण्यात येत असून या संपर्क नंबरवर : १) श्री प्रभाकर मोरे पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन मो नं ८४२४०५०५००२) श्री आर.जे.घुगे सहा. पोलीस निरीक्षक बारामती तालुका पोलीस स्टेशन मो नं ९५५२५९०३४७ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment