झोपडीधारकांना अडीच लाखात मिळणार हक्काचं घर,सरकारकडून मोठं गिफ्ट..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 25, 2023

झोपडीधारकांना अडीच लाखात मिळणार हक्काचं घर,सरकारकडून मोठं गिफ्ट..!

झोपडीधारकांना अडीच लाखात मिळणार हक्काचं घर,सरकारकडून मोठं गिफ्ट..!                         मुंबई:-  एक जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना फायदा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. या
परिपत्रकानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्याशिवाय या निर्णयामुळे झोपडपट्टी असलेल्या जागांचा विकास होणार आहे.
दरम्यान, मुंबईतील झोपडपट्टी वासियांसाठी घेतलेला हा सर्वात महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे.
उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांनी झोपडपट्टी
वासियांसाठी निर्णय घेऊ शकले नाही. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर तात्काळ झोपडपट्टी वाचण्यासाठी निर्णय घेतला गेला. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वासियांना लाभ मिळणार आहे, अवघ्या अडीच लाख रुपयांमध्ये घराचं स्वप्न मुंबईतील झोपडपट्टी वासियांचा पूर्ण होणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली.राज्य जारी केलेल्या निर्णयानुसार, या नव्या योजनेतील लाभार्थी झोपडपट्टीवासियांच्या अटी आणि शर्थी निश्चित करण्यासाठीची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment