आंतरजिल्हा दरोडेखोर/जबरी चोरी करणारे टोळीचे म्होरक्यास अटक, १८ गुन्हे उघडकीस, २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 12, 2023

आंतरजिल्हा दरोडेखोर/जबरी चोरी करणारे टोळीचे म्होरक्यास अटक, १८ गुन्हे उघडकीस, २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत...

आंतरजिल्हा दरोडेखोर/जबरी चोरी करणारे टोळीचे म्होरक्यास अटक, १८ गुन्हे उघडकीस, २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत...
पुणे:- मागील काही महीन्यांपासून पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग व एकांटी वस्तीमध्ये दरोडयांचे व जबरी चोरीचे तसेच घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. अंकित गोयल. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मितेश घट्टे . यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी ६ ते ७ पथके तयार करून वेगवेगळया ठिकाणी रवाना केलेली होती.स्थानिक गुन्हे शाखेने तयार केलेल्या पथकामार्फतीने समांतर तपास करीत असताना सी.सी.टी.व्ही. फुटेजचे आधारे, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने यापुर्वी अजय उल्हास्या काळे, रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले हेते त्याचेकडे केले तपासातून व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीवरून आरोपी नामे गणेश सुरेश भोसले वय २८ वर्षे रा.
वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात चोरीस गेले मालापैकी काही ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक बदाम, चोरलेली युनिकॉर्न गाडी, घडयाळ, ब्रेसलेट असा मिळून आला तसेच त्याचेकडे केले तपासात त्याने वेळोवेळी दरोडे, जबरी चोरी व घरफोडी चोरी करून चोरलेले सोन्याचे दागिने हे किरण भाऊसाहेब बेद्रे या सराफास विक्री केल्याची माहीती सांगितलेली असून त्यावरून किरण भाऊसाहेब बेद्रे, वय ३३ वर्षे, व्यवसाय सोनार, रा. मु. पो. वाळुंज, ता.नगर, जि.अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेले मालापैकी २९४ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण
रू. १७,६४,०००/- किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान १) अजय उल्हास्या
काळे, रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर, २) गणेश सुरेश भोसले वय २८ वर्षे रा. वाळुंज, ता. आष्टी पारनेर,जि बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर, ३) पावल्या ऊर्फ देवा कैलास काळे, ४) तुषार ऊर्फ
विशाल कैलास काळे, ५) शरद कैलास काळे, अ.नं. ३ ते ५ रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर यांचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच चोरलेले सोने हे किरण भाऊसाहेब बेद्रे, वय ३३ वर्षे, व्यवसाय सोनार,
रा. मु.पो. वाळुंज, ता. नगर, जि. अहमदनगर यास विक्री केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
सदर गुन्हयातील आरोपींना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक १५/०७/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे.उघडकीस आलेल्या गुन्हयांची यादी खालीलप्रमाणे.१) आळेफाटा पो.स्टे.गु.रजि.नं. १०५ / २०२३ भादवि कलम ३९५,३९७,२) शिक्रापुर पो.स्टे.गु.रजि. नं.५७७ / २०२३ कलम ३९५ आर्म अॅक्ट ४ (२५)
३) शिरुर पो.स्टे.गु.रजि. नं. ५१ / २०२३ कलम ३९२, ४५८,३४,४) शिरुर पो.स्टे.गु.रजि. नं. ३५९ / २०२३ कलम ३९४, ४५७,३८०
५) रांजणगाव पो.स्टे.गु.रजि. नं.३४४ / २०२३ कलम ३९४,३४
६) नारायणगाव पो.स्टे.गु.रजि.नं.२४९/२०२३ कलम ३९४,३४
७) दौड पो.स्टे.गु.रजि.नं. ७६ / २०२३ भादवि ४५७,३८०,३४
८) दौंड पो.स्टे.गु.रजि.नं. ८४ / २०२३ भादवि कलम ३७९
९) शिरुर पो.स्टे.गु. रजि. नं. २६९ / २०२३ कलम ३९२,४५७,३८०,३४
१०) रांजणगाव पो.स्टे.गु.रजि.नं.३४९ / २०२३ कलम ४५७,३८०,३४
११) रांजणगाव पो.स्टे.गु.रजि. नं. २२७ / २०२३ कलम ४५७,३८०, १२) शिक्रापुर पो.स्टे.गु.रजि. नं. ४२५ / २०२३ कलम ३९४,३४
१३) शिक्रापुर पो.स्टे.गु.रजि. नं. ५८१ / २०२३ कलम ४५७,३८०
१४) शिक्रापुरपो.स्टे.गु.रजि. नं. ५३९ / २०२३ कलम ३९४
१५) शिक्रापुर पो.स्टे.गु.रजि.नं.४९१/२०२३ कलम ४५४,४५७,३८०
१६) शिरूर पो.स्टे.गु.रजि. नं. २०७ / २०२३ भादंवि ४५७,३८०
१७) बेलवंडी पो.स्टे.गु.रजि. नं. २६७ / २०२३ कलम ३८०,३४२,३४
१८) पारनेर पो.स्टे.गु.रजि. नं. ५९३ / २०२३ भादंवि ३९४,३४२,३४
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. अंकित गोयल , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.मितेश घट्टे . यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, स.पो.नि.नेताजी गंधारे, स.पो.नि. महादेव शेलार, पो.स.ई.गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमित सिद- पाटील, प्रदिप चौधरी,शिवाजी ननवरे, सहा. फौज. तुषार पंदारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, प्रकाश वाघमारे, विनोद भोकरे, पो.हवा.सचिन
घाडगे, राजु मोमीन, दिपक साबळे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, अजय घुले, हेमंत विरोळे, विजय कांचन, विक्रमसिंह तापकीर, दत्ता तांबे, महेश बनकर, ज्ञानदेव क्षिरसागर, रामदास बाबर, निलेश शिंदे,चंद्रकांत जाधव, अभीजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, पो.ना. बाळासाहेब खडके, धिरज जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, निलेश सुपेकर, प्राण येवले, मंगेश भगत, सहा. फौज. काशीनाथ राजापुरे,मुकुंद कदम, प्रमोद नवले, पो.कॉ. दगडु विरकर, अक्षय सुपे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पो.नि. श्री. प्रमोद क्षिरसागर,
स.पो.नि. नितीन अतकरे, निखील रावडे, श्रीमंत होनमाने यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.श्री. नितीन अतकरे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment