बारामती:- बारामती परिसरातील इंटरनेट क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ई. नेट वर्ल्ड वेब प्रा. लि कडून जि. प. प्राथ. शाळा माळेगाव कॉलनी शाळेत कायमस्वरूपी मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली. कंपनीचे संचालक अमित साळुंके, युवराज गजाकस, आकाश काटे यांनी शाळेतील मुलांना इंटरनेटद्वारे जगभरातील माहिती मिळावी तसेच नवनवीन गोष्टी ज्ञात व्हाव्यात या उद्देशाने आणि एक सामाजिक कार्य म्हणून शाळेस कायमस्वरूपी मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली. या आधी
शाळेस सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्मार्ट टि.व्ही दिले होते,पण इंटरनेट अभावी त्याचा जास्त प्रमाणात उपयोग होत नव्हता हिच खंत शाळेचे मुख्याध्यापक मा. जगताप सर, सहकारी शिक्षक खेत्रे सर यांनी व्यक्त केली त्यानुसार युवा उद्योजकाकडून ही सेवा उपलब्ध कार्यान्वित केली आहे. या कामाचे कौतुक शाळेचे अध्यक्ष मा. कल्याण पाचागणे यांनी केले व आभार मानले.
No comments:
Post a Comment