बेकायदेशीर खासगी कोचिंग क्लासेस अकॅडमी शाळा यांच्या विरुद्ध लढ्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 11, 2023

बेकायदेशीर खासगी कोचिंग क्लासेस अकॅडमी शाळा यांच्या विरुद्ध लढ्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार..

बेकायदेशीर खासगी कोचिंग क्लासेस अकॅडमी शाळा यांच्या विरुद्ध लढ्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार..
बारामती:-जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी सर्व खासगी कोचिंग क्लासेस अकॅडमी यांना नोटिस दिलेले पत्र प्राप्त झाले. तसेच बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री महेश रोकडे साहेब, मुख्य अग्निशमन अधिकारी तसेच मुख कर विभाग अधिकारी यांनी उपोषणस्थळी येऊन सकारात्मक चर्चा करत परिसरातील सर्व खासगी कोचिंग क्लासेस अकॅडमी शाळा यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पत्र दिले.  या सर्व खासगी कोचिंग क्लासेस अकॅडमी यांना फायर ऑडिटच्या दूतिय नोटिसा देऊन सदर सर्व अकॅडमी क्लासेस यांच्या गेट वर बारामती नगरपरिषद नोटिस लावणार आहेत ज्या मध्ये नमूद असेल की सदर कोचिंग क्लास अकॅडमी यांचे फायर ऑडिट नाही तरी कुठलीही दुर्घटना झाल्यावर क्लास अकॅडमी जबाबदार राहतील तसेच नोटिस काळात फायर ऑडिट नाही केले तर त्यांच्यावर सीलची कारवाई करण्यात येईल. त्याच पद्धतीने सदर सर्व क्लास अकॅडमी यांच्या कडून कमर्शियल व व्यवसायिक कर वसूल करण्यात येईल व यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात येईल. असे आश्वासन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिले असता आजचे माझे उपोषण तात्पुरते स्थगित करत आहे.  आजच्या उपोषणास विविध राजकीय पक्ष संघटना मंडळ यांनी आवर्जून पाठींबा दिला त्या बद्दल सर्वांचे खूप खूप आभार तसेच अनेक पत्रकारांनी पाठींबा देत साथ दिली त्यांचेही आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment