बारामती:- आरोपी नामे पनिश उर्फ पांग्या आनंदया भोसले यांस खून प्रकरणात जिल्हा न्यायाधीश १ बारामती मा. श्री. व्ही. सी.बर्डे यांनी जन्मठेपेची व ३००० रूपये दंडाची शिक्षा सुनावली,दिनांक १०/१२/२०२५ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. १ मा.श्री. व्ही. सी. बर्डे साो. यांनी पनिश उर्फ पांग्या आनंदया भोसले मूळ रा. सोनगाव ता.बारामती जि. पुणे या आरोपीने युवराज आबासो थोरात रा. सोनगाव ता. बारामती जि.पुणे. याचा खून केल्याप्रकरणी कलम ३०२ साठी जन्मठेपेची (आजन्म कारावास) वतीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच कलम ५०४ साठी१ वर्षे शिक्षा ठोठावली आहे.थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक १५/०१/२०२० रोजी आरोपी पनिशउर्फ पांग्या आनंदया भोसले मूळ रा. सोनगाव ता. बारामती जि. पुणे. याने दि.१५/०१/२०२० रोजी मकर संक्रातीचा सण असल्यामुळे युवराज आबासो थोरात हेनिरा व क-हा नदीचे संगमावरील सोनेश्वर मंदीरात देवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.त्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांच्या घरातील सर्व लोक बरोबर होते. त्यावेळेस आरोपीनामे पनिश उर्फ पांग्या आनंदया भोसले याने युवराज आबासाहेब थोरात यांनाशिवीगाळ करण्यास सुरूवात केली. व त्यांना धक्का बुक्की करण्यास सुरूवात केली वम्हणाला की, तुझी बायको सरपंच असल्यामुळे तुम्हाला लय माझ आलाय का असेम्हणुन युवराज थोरात यांना धक्का मारूण खाली पाडले व स्वतःच्या कमरेला असलेलाचाकु काढून युवराज थोरात याचे उजवे बाजुचे छातीमध्ये खुपसला. त्यामुळे युवराजथोरात हे सदर जखमेमुळे मयत झाले व आरोपी हा तेथून पळून गेला. सदर बाबतचीफिर्याद सुरज युवराज थोरात यांनी बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे दि.१५/०१/२०२० रोजी दाखल केली. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण केल्यानंतर आरोपीविरूध्द मा. जिल्हा न्यायाधिश १ यांचे कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आले.सदरील सेशन केस मध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासले. सदरखटल्या कामी साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. सदरील सेशन केसमध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनीकाम पाहिले. सदर केसमध्ये फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकीलअॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मे. न्यायालयानेभा.द.वि. कलम ३०२ व ५०४ अन्वये वरीलप्रमाणे आरोपीस जन्मठेपेची व तीन हजाररुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच कलम ५०४ साठी १ वर्षेशिक्षा ठोठावली आहे.सदर प्रकरणी बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षकचंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी प्रमोद पोरे व अण्णासो घोलपतसेच बारामती येथील पैरवी अधिकारी गोरख कसपटे तसेच कोर्ट अंमलदार महिलापो. हवा. रेणुका पवार तसेच सदर सेशन केसचे संपुर्ण कामकाज सरकारी वकील अॅड.ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी पाहिले. व त्यांना सहकार्य अॅड. विनोद जावळे, अॅड.परिश रूपनवर, विश्वतेज थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले.
Post Top Ad
Wednesday, December 10, 2025
बारामतीत खून प्रकरणात सुनावली जन्मठेपेची व ३००० रूपये दंडाची शिक्षा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment