लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचा भव्य उत्सव.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 10, 2025

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचा भव्य उत्सव..

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचा भव्य उत्सव..
इंदापूर (पुणे):-राष्ट्रीय श्री संत भगवानबाबा विकास प्रतिष्ठाण निंबोडी आयोजित  लोकनेते व माजी ग्रामविकास मंत्री मा. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचा भव्य उत्सव निंबोडी येथे उत्साहात साजरा होणार आहे.
भव्य क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिनांक ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रतिष्ठाणमार्फत भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईला व्यासपीठ मिळावे, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून गावातील तसेच परिसरातील संघांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
*१२ डिसेंबरला रक्तदान शिबिर*
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ४ या वेळेत राष्ट्रीय श्री संत भगवानबाबा विकास प्रतिष्ठाण निंबोडी आयोजित व मुक्ताई ब्लड सेंटर, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हनुमान मंदिर, निंबोडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला प्रतिष्ठाणतर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
“सर्व धर्म समभाव” या घोषवाक्याखाली समाजहितासाठी होणाऱ्या या उपक्रमास मोठी उत्सुकता आहे.
*दिव्य प्रतिमेची गाव प्रदक्षिणा मिरवणूक*
याच दिवशी सायं. ५ ते ८ या वेळेत संत-महात्म्यांच्या दिव्य प्रतिमांची भव्य मिरवणूक गावातील मुख्य मार्गांवरून काढण्यात येणार आहे. उपस्थित भाविकांसाठी हा एक आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे.
*मराठमोळा पोह्या कार्यक्रम व शौर्यगाथा वर्णन*
शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत मराठमोळ्या सांस्कृतिक वातावरणात
ह.भ.प. शिवशाहीर  श्री कल्याण महाराज काळे पाटील व सहकारी यांचा खास “पोवाड्याचा कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात संत-महात्मे व राष्ट्रीय युगपुरुषांच्या पराक्रमाची शौर्यगाथा कथन केली जाणार आहे.
*प्रमुख मान्यवरांची उपस्थिती*
या कार्यक्रमास राज्य व केंद्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
प्रमुख मान्यवर
मा. दत्तात्रय मामा भरणे, कृषीमंत्री व पालकमंत्री, वाशिम
मा. सुनिल आण्णा शेळके, आमदार, मावळ
मा. पृथ्वीराज साहेबराव जाचक, चेअरमन, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर
प्रमुख उपस्थिती
मा. डॉ. सागरदादा डोईफोडे (IAS) – सचिव, दिव-दमन (आरोग्य वैद्यकीय)
मा.श्री धनराज भाऊ गुट्टे
 रेल्वे बोर्ड सदस्य व भाजपा युवा नेते
डॉ. संजय कुमार चौधरी, केंद्रीय  
एस.एस.सी बोर्ड सदस्य, राजस्थान
श्री केशवजी घोळवे,मा उपमहापौर, पिंपरी-चिंचवड
 श्रीमंत ढोले मा जिल्हा परिषद सदस्य
मा. बाळासाहेब सानप, अध्यक्ष, जय भगवान महासंघ, महाराष्ट्र राज्य

अॅड. रूपाली ताई ठोंबरे पाटील
सहाय्यक पोलीस निरीक्षक, वालचंदनगर श्री राजकुमार डुणगे, 
ऋषिकेष हंगे (RTO बारामती)
विविध सामाजिक कार्यकर्ते
उपक्रमाचे आयोजक
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय श्री संत भगवान बाबा विकास प्रतिष्ठान व लोकनेते गोपीनाथराव मुंडे युवा प्रतिष्ठाण आणि ग्रामस्थ निंबोडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या लोकहितवादी विचारांचा जागर सतत ठेवण्यासाठी सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिर, मिरवणुका व संस्कृती जपणारे कार्यक्रम हे सर्व मोठ्या उत्साहात पार पडणार आहे असे राष्ट्रीय श्री संत भगवान बाबा विकास प्रतिष्ठान  कार्यअध्यक्ष पुष्कर दिपक खाडे यांनी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment