येथे भय संपत नाही,माळेगावात भरदिवसा ठेकेदारावर हल्ला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 19, 2026

येथे भय संपत नाही,माळेगावात भरदिवसा ठेकेदारावर हल्ला..

येथे भय संपत नाही,माळेगावात भरदिवसा ठेकेदारावर हल्ला..            बारामती :- बारामती तालुक्यातील माळेगाव येथे भरदिवसा घडलेल्या मारहाणीच्या घटनेने माळेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथे भय संपत नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.नुकताच चार जणांच्या टोळक्याने ठेकेदार दिलीप जगताप यांच्यावर अचानक हल्ला करून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना टाके पडले आहेत.
ही घटना बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी माळेगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर घडली. दिलीप जगताप हे नेहमीप्रमाणे आपल्या कामानिमित्त त्या परिसरात आले असताना अचानक चार जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांसह कठोर वस्तूंचा वापर करत त्यांना बेदम मारहाण केली. डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीमय वातावरण झाले आहे.दरम्यान, माळेगावसारख्या ठिकाणी ही घटना घडल्याने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पुन्हा अशा घटना घडू व गुन्हेगारावर पोलिसांचा धाक रहावा अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

No comments:

Post a Comment