स्व.अजितदादांच्या निधनामुळे गोजुबावीची पिरसाहेब यात्रा साद्या पद्धतीने साजरी होणार;सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 20, 2026

स्व.अजितदादांच्या निधनामुळे गोजुबावीची पिरसाहेब यात्रा साद्या पद्धतीने साजरी होणार;सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द..

स्व.अजितदादांच्या निधनामुळे गोजुबावीची पिरसाहेब यात्रा साद्या पद्धतीने साजरी होणार;सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द..
​गोजुबावी (प्रतिनिधी):-गोजुबावी गावचे आराध्य दैवत पिरसाहेब उरूस यात्रा उत्सवाबाबत 'पाडवा वाचन' प्रसंगी यात्रा कमिटीने एक महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीची यात्रा अत्यंत साध्या आणि शांत पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
​आज झालेल्या ग्रामसभेत आणि पाडवा वाचनाच्या कार्यक्रमात ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने एकमताने हा ठराव मंजूर केला. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी ही यात्रा यंदा केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित राहणार आहे.

*यात्रेचे स्वरूप आणि महत्त्वाचे बदल:* 
​ *धार्मिक विधी:* पिरसाहेबांचे सर्व पारंपारिक धार्मिक विधी, पूजा आणि विहित कार्यक्रम परंपरेनुसार श्रद्धेने पार पडतील.

*मनोरंजन कार्यक्रम रद्द:* यात्रेनिमित्त आयोजित केले जाणारे तमाशा, ऑर्केस्ट्रा किंवा इतर कोणतेही सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत.

*श्रद्धांजलीचा ठराव:* आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि गावातील शोकभावना जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कमिटीने स्पष्ट केले.
​या निर्णयाबाबत बोलताना तुषार गटकळ (यात्रा कमिटी, गोजुबावी) म्हणाले की, "दादांचे जाणे हे आमच्या गावासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी न भरून निघणारे नुकसान आहे. त्यांच्याबद्दलचा आदर आणि गावातील दुःखाची जाणीव ठेवून आम्ही यंदा उत्सवाचा उत्साह बाजूला ठेवून केवळ धार्मिक परंपरा जपण्याचा निर्णय घेतला आहे."

​ *पिरसाहेब यात्रा कमिटीने सर्व भाविकांना आणि ग्रामस्थांना या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.याबाबतची माहिती पिरसाहेब यात्रा कमिटी,गोजुबावी व 
तुषार गटकळ व सर्व गोजुबावी समस्त ग्रामस्थ यांनी दिली.

No comments:

Post a Comment