अतनूर(प्रतिनिधी):- ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य एवमं ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री हावगीस्वामी कॉलेज महाविद्यालयातील सभागृहात जागतिक ग्राहक हक्क दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळीच ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे कार्य करणे ही जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ए.ए.काळगापुरे, प्राचार्य श्री.हावगी स्वामी महाविद्यालय, उदगीर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एन.जी.यमेकर उपप्राचार्य, श्री.हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर, डॉ.एस.डी.लोहारे, डॉ.ए.आर कवठाळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री हावगस्वामी महाविद्यालय, उदगीर, प्राध्यापक मनोहर भालके, दत्ता बिरादार, राम राठोड उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राज्याध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष तानाजीराव नरहरीराव गुंड, राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीशकुमार बुरगुटे, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे तसेच ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्य प्रदेश संघटक तथा मराठवाडा अध्यक्ष बालासाहेब शिंदे, प्रा.डॉ.अविनाश प्रभातराव पाटील, प्रा.डॉ.सुनील यशवंतराव ढगे, तालुकाध्यक्ष प्राचार्य व्ही.एस.कणसे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आर.एन.जाधव, प्रा.विकास पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, महाविद्यालयीन कॉलेजकुमार, युवक, युवती, तरुणी, पदाधिकारी, कर्मचारी, ग्राहक स्वंयसेवक उपस्थित होते.
ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य व ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यकर्ते कार्यरत असून, संस्थापक राज्याध्यक्ष तानाजीराव नरहरी गुंड, राज्य प्रदेश कार्याध्यक्ष सतीशकुमार बुरगुटे, नवनिर्वाचित बी.जी.शिंदे अतनूरकर राज्य कार्यकारी संघटक तथा मराठवाडा अध्यक्ष हे केंद्रीय कार्यकारिणीत आहेत.
ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य उदगीर येथील ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन मेळावा शिबिरात नवीन महाराष्ट्र प्रदेश राज्यसंघटक तथा मराठवाडा अध्यक्ष पदावर बी.जी.शिंदे अतनूरकर यांची निवड करण्यात आली तसेच त्यांना प्राचार्य काळगापुरे, राज्याध्यक्ष तानाजी गुंड, कार्याध्यक्ष सतीशकुमार बुरगुटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. उदगीर तालुका अध्यक्षपदी प्राचार्य व्यंकटराव कणसे, कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ.अविनाश प्रभातराव पाटील, तालुका उपाध्यक्षपदी प्रा.डॉ.सुनील यशवंतराव ढगे, तालुकाध्यक्ष प्राचार्य व्ही.एस.कणसे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आर.एन.जाधव, प्रा.विकास पाटील, व इतर पदाधिकारी निवडले गेले. तसेच पोलीस मित्र व ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती महाराष्ट्र राज्य शासकीय शासननियुक्त नोंदणीकृत ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून, ती ग्राहकांच्या हक्कासाठी सक्रिय राहणार आहे. या ग्राहक संस्थेचे उद्दिष्ट्ये सदोष वस्तू, सेवा आणि सायबर फसवणुकीविरुद्ध ग्राहकांना जागरूक करणे, तसेच तक्रार निवारण मंचाद्वारे न्याय मिळवून देणे हे नवीन कार्यकारिणीचे प्रमुख ध्येय आहे.
No comments:
Post a Comment