बारामती(संतोष जाधव ):-बारामती ही महाराष्ट्राच्या नकाशात प्रसिद्ध असणारे शहर, या शहरात विकासाची गंगा वाहते, याचं श्रेय स्वर्गीय महाराष्ट्राचे लाडके अजितदादा पवार यांना जातंय त्यांनी बारामतीचा कायापालट करून नावा रूपास आणले, पण काळाने घाला घालून बारामतीचे दादा यांची प्राण ज्योत मालवली आणि संपूर्ण बारामती दुःखाच्या छायेत आली आजही दादा आमच्यात आहे असे वाटते,दादांचा धाक, प्रशासनावर असणारी पकड आज कमी झाली असल्याची दिसतय. याला कारणही तसे आहे आज प्रशासन व प्रशासकीय यंत्रणा सुस्त झाली की काय असं भासू लागलंय. पोलीस यंत्रणा आपलं काम चोक करीत आहे, पण त्याला जोड इतर खात्याची असावी लागते इतर पथक काही घटनेचा तपास कसा व कधी लावतोय दिसत नाही, नुकताच काही दिवसापूर्वी बारामतीत करोडो रुपयांचा गांजा सापडला त्यांची प्रसिद्धी झाली कौतुक झालं पण त्या गांज्याच्या मालकाचा तपास अजूनही लागत नाही ही बाब कुठेतरी खटकतेय असं सर्व सामान्य जनतेला वाटू लागलय, एवढ्या मोठया प्रमाणात बारामतीत गांजा येतोय तो नकळत सापडला, या आधी देखील असा गांजा येत असेल कारण तालुक्यात गांजा सर्रास विकला जात होता व काही ठिकाणी नॉर्मल कारवाई झाली.कोट्या वधी रुपयाचा गांजा सापडतो पण तो कुणाचा आहे?..त्याचा मालक कोण?.. यांना कोण पाठीशी घालतंय ?..पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष घालतील का?.. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल का?..की या प्रकरणात कुणाचे लागेबंदे आहे?.. असे अनेक प्रश्न सर्व सामान्यांना पडले आहे.बारामती एक चांगले नावाजलेले शहर आहे या शहरात आजही अश्या घटनेतील सूत्रधार सापडू शकत नाही ही बाब कुठेतरी खटकतेय याबाबत लवकरच गृहमंत्री यांना निवेदन देऊन स्पेशल पथक नेमून मेन सूत्रधार शोधण्यासाठी मागणी करणार असल्याचे सांगण्यात आलेय.***
बारामतीचे पोलीस सक्षम.. गांज्याचा मुद्देमाल सापडतो पण मालक सापडत नाही, तपासात दिरंगाई का?
No comments:
Post a Comment