बारामती: येथील रागिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना साडी बँक या उपक्रमा अंतर्गत साडी संकलन करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत बारामती आणि परिसरातील महिलांनी साडी संकलनामध्ये सहभाग घेऊन साड्यांचे संकलन केले होते. याचे वितरण सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथील ऊसतोड मजूर महिलांना करण्यात आले.
साडी संकलनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक महिला पुढाकार घेऊन साड्या जमा करतात, जमा केलेल्या साड्यांचा वापर गरजू महिलांसाठी होत आहे आहे.त्यामुळे साडी बँक उपक्रमास योग्य प्रतिसाद मिळत असल्याचे रागिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले. साडी बँक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते.
साडी संकलनाकरिता रंजना झगडे,वृषाली वाघोले, आरती तावरे, ज्योती खानजोडे यांचे सहकार्य लाभले.
तर हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी रागिनी फाऊंडेशन सदस्य मंडळ, संतोष शेंडकर व कोपीवरची शाळा टीमचे योगदान लाभले.
No comments:
Post a Comment