भारत आणि नेपाळमधील सामाजिक समता या विषयावर १२वी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषद लुंबिनी येथे संपन्न... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 23, 2026

भारत आणि नेपाळमधील सामाजिक समता या विषयावर १२वी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषद लुंबिनी येथे संपन्न...

भारत आणि नेपाळमधील सामाजिक समता या विषयावर १२वी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषद लुंबिनी येथे संपन्न...
लुंबिनी-नेपाळ:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व भारत आणि नेपाळमधील सामाजिक समता या विषयावर  १२वी  राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषद लुंबिनी वर्ल्ड पीस ॲन्ड हर्मोनी व्हिजीटर  सेंटर या ठिकाणी भारतीय संयंसेवी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील अप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.वैशाली देठे होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन  
महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया - लुंबिनी  चे इन्चार्ज भन्ते नंदा 
यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी पटणाचे माजी सरपंच प्रदीपकुमार पासवान , काठमांडू येथून लायन्स क्लबच्या पूजा पालरिवाल उपस्थित होते.
 जगावर युध्दाचे सावट पडलेले आहे.युध्दाच्या बातम्यांनी मन भयभीत होत आहे.जगातील सर्व राज्यकर्त्यांनी मानवी कल्याण करणे हे आपले ध्येय ठेवणे आवश्यक आहे आणि हे ध्येय त्यांच्यामधे निर्माण होण्यासाठी जगातील राज्यकर्त्यांनी बौद्ध धर्माचा , बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काठमांडू येथे चौथ्या जागतिक परिषदेमध्ये केलेल्या भाषणाचा संदर्भ देऊन बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ असा धर्म आहे व तरूण वर्गाने बौद्ध धर्माचे संवर्धन व जतन करून जगाचे कल्याण साधण्यासाठी झटले पाहिजे असे आवाहन  परिषदेच्या अध्यक्ष प्रा.वैशाली देठे यांनी या परिषदेच्या निमित्ताने व्यक्त केले .
  भन्ते नंदा , यांच्या हस्ते उपस्थितांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले 
      या परिषदेसाठी नेपाळ , महाराष्ट्र , पटणा , झारखंड ,आसाम इत्यादी ठिकाणांहून प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेचे आयोजक प्रा.गोरख साठे यांनी कार्यक्रमाचे  प्रास्ताविक केले .
 भारताचे व नेपाळचे राष्ट्रगीत गाऊन परिषदेची सांगता झाली

No comments:

Post a Comment