अनैतिक संबंधातून थंड डोक्याने, क्रूर पद्धतीने तरुणाचा निर्घृण खून..संशयितांना केली पोलिसांनी अटक .
फलटण :- नुकताच एका घटनेत अनैतिक संबंधातून या तरुणाचा काटा काढण्यात आल्याचे समोर आले.घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल असलेल्या एका 27 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले.याप्रकरणी संशयित महिला, तिचा पती व प्रियकर यांना
पोलिसांनी अटक केली आहे.खून झालेला तरुण संशयित महिलेचा दुसरा प्रियकर आहे.दरम्यान, खून केल्यानंतर मृतदेहाचे मशिनच्या सहाय्याने
तुकडे करून त्याचे एक पोते शेततळ्यात तर दुसरे निरा नदीत टाकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.सतीश ऊर्फ आप्पा दादासो दडस (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेतील एका महिलेसह तिचा पती लखन बुधावले व प्रियकर सतीश माने (रा विडणी, ता. फलटण) अशा तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली.याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमंथळी (ता. फलटण) येथील सतीश दडस हा तरुण बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार त्याचा भाऊ सागर दडस यांनी 21 जानेवारी 2026 रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्याबाबत तपास करत असताना संबंधित तरुणाचा घातपात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना मांगोबा माळ, विडणी ता. फलटण येथील एका महिलेचे गावातील सतिश तुकाराम माने याच्याबरोबर सुरुवातीला प्रेमसंबंध होते.
परंतु नंतर तीचे मयत सतीश दडस याच्या बरोबरही प्रेमसंबंध निर्माण झाले होते, अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करुन संबंधित महिलेचा पती व तिचा प्रियकर सतीश माने यांना ताब्यात घेऊन त्यांची
चौकशी केली. परंतु संशयितांनी कोणतीही माहिती न देता आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे व गुन्हा केला नसल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी संशयित महिलेस ताब्यात घेऊन तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने माझ्या सोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून मकर संक्रांती दिवशी सतिश उर्फ आप्पा दडस याच्याशी सतीश माने व लखन बुधावले यांचा वाद झाला होता. त्यावेळी या वादातून दोघांनी सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले
होते. त्यानंतर तेथून त्यांनी त्याला दवाखान्यात घेवून जात असल्याचा बनाव करुन विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेले व तेथे त्यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला.अतिशय थंड डोक्याने, क्रूर पद्धतीने निर्घृण खून केलेल्या
या घटनेचा अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून फलटण ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर,पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या सूचनेनुसार
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार,शिवानी नागवडे, पोलीस हवालदार प्रदीप खरात, वैभव सूर्यवंशी, नितिन चतुरे, अमोल जगदाळे, विक्रम बनकर,गणेश यादव, संदीप मदने, अमोल चांगण, पोलीस कॉनस्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे, गणेश ठोंबरे,शिवराज जाधव, अमोल देशमुख, सुरज काकडे, अविनाश शिंदे, यु.आर. पेंदाम, गौरी सावंत यांनी केली असल्याचे सूत्रांकडून समजलं.
No comments:
Post a Comment