बारामती (प्रतिनिधी):-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणांगणात बहुजन समाज पार्टीनेही दमदार एन्ट्री घेतली असून, बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांच्या आदेशानुसार ही यादी निश्चित करण्यात आली असून, पक्षाचे शहराध्यक्ष भास्कर दामोदरे यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धीस दिली आहे.
जिल्हा परिषद गटासाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये गुणवडी गटातून उर्मिला प्रवीण शिंदे, पणदरे गटातून विशाल दिलीप घोरपडे, वडगाव निंबाळकर गटातून अश्विनी रामदास खोमणे, निंबूत गटातून संतोष पोपट कांबळे तर निरावागज गटातून संजय प्रल्हाद कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच पंचायत समिती गणासाठी वडगाव निंबाळकर गणातून दयानंद मोतीराम पिसाळ, पणदरे गणातून विशाल दिलीप घोरपडे, मुढाळे गणातून ऋतुजा दत्ता बरकडे आणि गुणवडी गणातून दिव्या बाळासो कांबळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
बहुजन समाज पार्टी बारामतीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून, सामाजिक न्याय, बहुजन हितसंबंध आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत ही निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या उमेदवार घोषणेमुळे बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, आगामी काळात प्रचाराला वेग येणार आहे.
No comments:
Post a Comment