बानपचे नगरसेवीका सौ.आरतीताई गव्हाळे विरोधी पक्ष गटनेते पदी,तर नगरसेवक श्री यशपाल पोटे ' यांची प्रतोद पदी निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 21, 2026

बानपचे नगरसेवीका सौ.आरतीताई गव्हाळे विरोधी पक्ष गटनेते पदी,तर नगरसेवक श्री यशपाल पोटे ' यांची प्रतोद पदी निवड..

बानपचे नगरसेवीका सौ.आरतीताई गव्हाळे विरोधी पक्ष गटनेते पदी,तर नगरसेवक श्री यशपाल पोटे ' यांची प्रतोद पदी निवड..                    बारामती:- बारामती नगर परिषदचे नगरसेवीका सौ.आरतीताई गव्हाळे विरोधी पक्ष गटनेते पदी, तर नगरसेवक श्री यशपाल पोटे ' यांची प्रतोद पदी  निवड करण्यात आले आहे.बारामती नगर परिषदेमध्ये राजकीय घडामोड घडली असून, बारामती सर्वांगीण विकास आघाडीच्या वतीने आरती मारुती शेंडगे गव्हाळे यांची विरोधी पक्ष गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे [1.1]. या निवडीमुळे राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
सौ आरती ताई गव्हाळे यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या संदर्भात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये "संधी अनुभवी नेतृत्वाला, सर्वांगीण विकासाला" हा संदेश देण्यात आला आहे.
आरतीताई गव्हाळे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत काम केले असून, त्यांच्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा आगामी काळात नगर परिषदेच्या कामकाजात दिसून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे तसेच श्री यशपाल सुनील पोटे हे देखील नवखे असले तरी त्यांना कुटुंबातून वडील श्री सुनील हरिभाऊ पोटे यांच्यामार्फत राजकीय वारसा आहे. श्री सुनील हरिभाऊ पोटे हे बारामती नगर परिषदेचे माजी. नगराध्यक्ष व धडाडीचे नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत, शहरातील व्यापारी वर्ग व उद्योजक यांच्यामध्ये त्यांचे नाव नावलौकिक आहे. त्यामुळे बारामती शहरातील व्यापारी वर्ग  उद्योजक व सामान्य नागरिक यांचे मूलभूत प्रश्न सौ आरती ताई गव्हाळे व श्री यशपाल पोटे यांच्यामार्फत नक्कीच सोडवले जातील असा विश्वास व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये आहे. या निवडीबद्दल बारामती नगरपरिषद आणि बारामती सर्वांगीण विकास आघाडीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment