बारामती तालुक्यात भाजपा व राष्ट्रवादीत युती नसल्याचे केले स्पष्ट जाहीर पत्रक प्रसिद्ध.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 21, 2026

बारामती तालुक्यात भाजपा व राष्ट्रवादीत युती नसल्याचे केले स्पष्ट जाहीर पत्रक प्रसिद्ध..

बारामती तालुक्यात भाजपा व राष्ट्रवादीत युती नसल्याचे केले स्पष्ट जाहीर पत्रक प्रसिद्ध..
पुणे: बारामती तालुक्यातील  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील युतीबाबत स्पष्टता करण्यात आले,बारामती तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात युती असल्याबाबत काही ठिकाणी गैरसमज व अफवा पसरविल्या जात
आहेत. सदर बाबी स्पष्ट करण्यासाठी हे पत्र देण्यात येत आहे.बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या मधे कोणत्याही गणात व गटात युती नाही.भाजप स्वतंत्रपणे ही निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढवत आहे.असे पत्र भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण)चंद्रशेखर अशोकराव वढणे जिल्हाध्यक्ष भाजपा पुणे ग्रामीण (दक्षिण) यांनी प्रकाशित केले आहे.

No comments:

Post a Comment