बारामती नगर परिषदेचा कारभार जनतेसाठी की मलिदा गॅंग साठी..? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 23, 2026

बारामती नगर परिषदेचा कारभार जनतेसाठी की मलिदा गॅंग साठी..?

बारामती नगर परिषदेचा कारभार जनतेसाठी की मलिदा गॅंग साठी..?        बारामती(संतोष जाधव):-नुकताच बारामती नगर परिषद निवडणूक झाली यामध्ये सहा उमेदवार सोडून बाकी सगळे राष्ट्रवादी कॉग्रेस चे नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आले तसेच विरोधात आलेल्या सहा नगरसेवका पैकी तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला यामुळे जनतेत मतदारात नाराजी झाल्याची चर्चा होती आम्ही निवडुन दिले होते मात्र आमचा अपेक्षा भंग झाला,मात्र तीन नगरसेवक ठाम राहिले बहुजन समाज पार्टीचा एक, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचा एक व अपक्ष एक असे तिघेजण विरोधात राहिले अश्या पध्दतीने बारामती नगर परिषदेच्या कारभारात सर्व समिती,स्वीकृत चार नगरसेवक व उपनगराध्यक्ष अश्या निवडी पार पडल्या, पदभार हाती घेतला असला तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र यामध्ये जनतेची कामे त्याच्या अडीअडचणी  सोडवण्यासाठी निष्क्रिय ठरत आहे जनतेची कामे का करीत नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे, गेल्या अनेक दिवसांपासून बारामती नगर परिषदेच्या बाहेर उपोषण चालू आहे त्याची दखल अद्यापही घेतली नाही की काही नागरीकांनी निवेदन दिले तरी त्याची दखल घेतली नाही,तीन हत्ती चौक  कॅनॉल रोड लगत थांबलेल्या वाहनांमुळे अपघात होत आहे,याचे निवेदन दिले मात्र त्या निवेदनाला केराची टोपली दाखविली की काय असा प्रश्न पडतो, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बारामतीत  विकास करीत आहे असे असताना झाडे लावा असे आवर्जून सांगतात मात्र दुसरीकडे त्यांचेच पदाधिकारी याचे कार्यकर्ते झाडे इमारती बांधण्यासाठी तोडतात याची तक्रारी केली तरी दखल घेतली जात नाही हे मात्र दुर्दैवाने बारामतीच्या जनतेसाठी असणारी नाचक्की आहे.जो तो बारामती नगरपरिषदेमध्ये गेलाय आणि ज्या त्या टेबलवर खाते(विभाग)प्रमुख   बसलेला नसतो कारण म्हणे प्रदर्शनासाठी रंगरगोटी, झाडे लावणे, रस्ते दुरुस्त करणे,झाडू मारणे यासाठी यंत्रणा राबत असल्याचे नागरीक सांगत होते, ही त्यांची कामे चालू होती मात्र पगार जनतेने भरलेल्या टॅक्स मधून घ्यायचा आणि कामे मात्र दुसऱ्याची करायची हे चित्र दिसत होतं, अमका आला, तमका आला, याचा कार्यक्रम त्याचा कार्यक्रम लगेच बारामती नगर परिषदेचे कर्मचारी पहाटेपासून त्याठिकाणी राबत असल्याचे दिसत होती.यावर कोणतंही नियंत्रण नव्हतं की कोणी जाब विचारणाऱ्या साठी किंवा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नव्हतं,म्हणतात ना की 'बारामती जनतेची की मलिदा गँगची' कारण याठिकाणी मलिदा गँग जास्त सक्रिय असल्याचे दिसत होते आपली टेंडर, आपलं कॉन्ट्रॅक्ट, आपलं काम जी (बिगर टेंडर)वशील्याने टक्के वारी देऊन कशी मिळतील यासाठी येत होती व येत आहे त्यांच्या साठी यंत्रणा कशी राबत आहे याचीच चर्चा बारामतीकर करताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment