याच साठी केला होता का हट्टाहास..? स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा दिला राजकीय बळी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 26, 2026

याच साठी केला होता का हट्टाहास..? स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा दिला राजकीय बळी..!

याच साठी केला होता का हट्टाहास..? स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा दिला राजकीय बळी..!      बारामती:-सद्या राजकिय वातावरण तापले असून नुकताच नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुका झाल्या तोच जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूका लागल्या अनेक वर्षांपासून उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी कार्यकत्यांनी अहोरात्र मेहनत घेतली,पक्षासाठी वाटेल ते केले मात्र आज अशीही वेळ आली आहे की, राजकीय पक्षाचे नेते आपले हितचिंतकासाठी कार्यकर्त्यांचा राजकीय बळी दिल्याचं समोर येतंय तश्या  नाराजीतून भावना व्यक्त होताना दिसत आहे.नगरपरिषद मध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची उमेदवारी घेतली मात्र त्यांचा राजकीय बळी कसा घेतला गेला याचा चौकाचौकात चर्चा ऐकावयास मिळत आहे,काही स्वयं घोषित पुढाऱ्यांनी मात्र विरोधकांशी पूर्व नियोजित आर्थिक माया घेऊन सेटलमेंट केले की काय म्हणूनच हवे ते व म्हणावं तसं सहकार्य कार्यकर्त्यांना मिळालं नसावं नव्हे ते मिळू नये म्हणून दोन चार मलिदा गॅंग वाली हाताशी धरून त्यांनी कदाचित पुढील राजकीय भविष्यातील पोळी भाजून घेतली असावी, असा तर्क जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसत असल्याची चर्चा रंगू लागल्या आहे, कोण कोणासाठी काम करतंय हे न समजन्यापलिकडे आत्ताची कार्यकर्ते दूध खुळी राहिली नाही हे कदाचित यांना कळावे नसावे म्हणूनच येणाऱ्या मतदानातून भलेही मताला हजारो रुपये वाटले तरी याची जागा त्यांना दाखविल्या शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.पूर्वनियोजित सेटलमेंट करून आपल्याच पक्षाची गद्दारी करून फक्त आपली व आपल्या जवळच्याची पोळी कशी भाजून घेतली हे सद्याच्या घडामोडीवरून दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे.म्हणूनच चर्चा होताना दिसत आहे. "याच साठी केला होता का हट्टाहास..."    *क्रमशः*

No comments:

Post a Comment