राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्न औषध प्रशासन कोमात;पोलीस जोमात.. बेकायदेशीर गुटखा वाहतूक व दारुच्या कारवाईत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त..
वडगाव निंबाळकर:-बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा व दारूचा साठा यावर कारवाई करण्यात आली,दि. 25 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मौजे लोणी भापकर (ता. बारामती) गावच्या हद्दीत अनिता दिलीप लोंढे (रा. लोणी भापकर) ही महिला बेकायदेशीरपणे देशी, विदेशी व
गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ती मारुती सुझुकी इको चारचाकी (क्र. एम.एच. 42 बी. जे. 1145 ) जवळ आढळून आली.वाहनाच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात दारूचा साठा मिळून आल्याने सदर मुद्देमाल व वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,या कारवाईत 4 लाख 9 हजार 440 रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार तौसिफ मणेरी करीत आहेत.बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमावर तसेच विनापरवाना देशी, विदेशी व गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका
महिलेवर स्वतंत्र कारवायांमध्ये गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी दोन चारचाकी वाहनांसह एकूण 8 लाख 6 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या
आधारे निरा-मोरगाव रोडवर मौजे चौधरवाडी
गावच्या हद्दीत संशयित हुंडाई कंपनीची 120
चारचाकी गाडी (क्र. एम. एच. 42 ए. एच.
9353) थांबवून तपासणी करण्यात आली.वाहनामध्ये पांढऱ्या रंगाची पोती आढळून आल्याने सदर गाडी पोलीस स्टेशन येथे
आणून तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला विमल पान मसाला व गुटखा असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी वैभव बाळासो चांदगुडे (रा.दंडवाडी, सुपा, ता. बारामती, जि. पुणे)
याच्याकडे वाहतूक परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने मुद्देमाल व वाहन जप्त करून भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (1)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत i20 चारचाकीसह 3 लाख 96 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे करीत आहेत.ही कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केली मात्र हे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्न औषध प्रशासन यांनी करणं गरजेचं होतं,मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
No comments:
Post a Comment