धक्कादायक...एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांडात वेगळा प्रकार समोर ;एक दोन नव्हे तर चार खून करणाऱ्या आरोपीस अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 27, 2026

धक्कादायक...एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांडात वेगळा प्रकार समोर ;एक दोन नव्हे तर चार खून करणाऱ्या आरोपीस अटक..

धक्कादायक...एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांडात वेगळा प्रकार समोर ;एक दोन नव्हे तर चार खून करणाऱ्या आरोपीस अटक..                सुपा:- सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी गावचे हद्दीत मिळून आलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा उलगडा करत एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आणून अदयाप पर्यंत चार खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
करणेत आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व सुपा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांची कामागिरी
सुपा पोलीस ठाणे गु.र.नं. १२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि. १९ / ०१/ २०२६ रोजी दाखल आहे. सदर
गुन्हयात काळखैरेवाडी ता. बारामती जि. पुणे गावचे हद्दीतील खैरेपडळ येथे अनोळखी महिलेचा मृतदेह दि. १९/ ०१ / २०२६ रोजी स.
०७/०० वा दरम्यान आढळून आला होता. तिचे डोक्यावर जखमा झालेल्या होत्या, तिला उपचारकामी दवाखान्यात नेले असता,
डॉक्टरांनी तपासून तिला उपचारापूर्वी मयत घोषित केले आहे. सदर बाबत बीट अंमलदार विशाल महोदव गजरे पो.हवा. १३०९ सुपा
पोलीस स्टेशन यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून फिर्याद नोंदविली असल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन
करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सुपा पोलीस स्टेशन कडील पथकांनी एकत्रित सुरू
केला. घटनास्थळाची पाहणी करून आजु बाजूचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. दरम्यान एका संशयित व्यक्तींची हालचाल त्या परिसरात आढळून आली, त्याचप्रमाणे घटनास्थळावर एक लहान डायरी मिळून आली होती, त्या परिस्थीतीजन्य पुराव्याचे आधारे साक्षीदार लालासाहेब मारुती जाधव, रा. पिसर्वे ता. पुरंदर जि. पुणे यांचे कडे चौकशी करणेत आली असता, लालासो जाधव हे चिंचेची झाडे खरेदी करून चिंचा झोडण्याचे काम करतो. त्याचेकडे कामगार असतात, त्यामुळे त्यास मिळून आलेले फुटेज दाखविणेत आले असता, सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित इसम हा जैतू चिंधू बोरकर वय ४३ वर्षे मजुरी रा. कोयंडे खु॥ ता. खेड जि. पुणे हा असल्याची समजले. तपास पथकाने त्याचा शोध घेवून त्यास खेड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेवून चौकशी केली असता, आरोपी जैतू चिंधू बोरकर वय ४३ वर्षे मजुरी रा. कोयंडे खु ता. खेड जि. पुणे हा मजूरी काम करतो, त्याचे सोबत
कोयंडे परिसरात मजुरी कामासाठी मयत महिला रंजना अरूण वाघमारे वय २५ वर्षे मजूरी मुळ रा. खांडपे ता. कर्जत जि. रायगड व सुरज अंकुश वाघ मुळ रा. वांगणी ता. बदलापूर जि ठाणे असे होते.आरोपी जैतू चिंधू बोरकर याचे मयत महिलेवर एकतर्फी प्रेम असल्याने तो तिला त्याचे सोबत राहण्याची जबरदस्ती करत होता, महिलेने विरोध दर्शविल्यामुळे आरोपी जैतू बोरकर याने रागाचे भरात दि. १७/०९/२०२६ रोजी रात्रीचे वेळी कोयंडे गावातील चौऱ्याचा डोंगर परिसरात सुरज अंकुश वाघ वय ३० वर्षे मुळ रा. वांगणी ता. बदलापूर जि ठाणे याचे डोक्यात कोयत्याने मारहाण करून त्याचा खून केला आणि महिला रंजना वाघमारे हिला घेवून सुपा परिसरात निघुन गेला.दि. १८/०१/२०२६ रोजी सुपा येथील काळखैरेवाडी परिसरात असताना रात्रीचे वेळी महिला रंजना वाघमारे हिने त्याचे सोबत
राहण्यास नकार दिली, ती पोलीसांकडे तक्रार करेल या भितीने आरोपी जैतू चिंधू बोरकर याने तिचा देखील डोक्यात दगडाने मारून खून
केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून मयत सुरज अंकुश वाघ वय ३० वर्षे मुळ रा. वांगणी ता. बदलापूर जि ठाणे याचे
खूनाबाबत खेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४४ / २०२६ भा. न्या. सं. कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. आरोपी जैतू
चिंधू बोरकर याने एकतर्फी प्रेमातून दोन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपी जैतू चिंधू बोरकर यास दि २१/०१/२०२६ रोजी अटक करणेत आलेली असून मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्याची दि. २७/०१/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे.
आरोपी जैतू चिंधू बोरकर हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर खेड पोलीस स्टेशन येथे सन २००७, २०१८ मध्ये दोन खूनाचे गुन्हे दाखल असून सन २०२६ मध्ये दोन असे अदयाप पर्यंत चार खूनाचे गुन्हे दाखल झाले असून एकूण पाच व्यक्तींचे खून करणेत आलेले आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पो स्टै चे पो. नि. सुभाष चव्हाण, सुपा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, स्थागुशाचे सपोनि कुलदीप संकपाळ, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, सुपा पोस्टेचे पोसई जिनेश कोळी, स्थागुशाचे अंमलदार ज्ञानेश्वर क्षिरसागर,
अजय घुले, निलेश शिंदे, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, सुपा पो स्टे चे अंमलदार संदिप लोंढे, विशाल गजरे, महादेव साळुंखे,
किसन ताडगे, रूपेश साळुंखे, राहुल भाग्यवंत, निहाल वणवे, तुषार जैनक, सोमनाथ होले, महिला अंमलदार अश्विनी चांदगुडे, दिपाली
मोहिते खेड पो स्टे चे श्रेणी पोसई शंकर भवारी, अंमलदार संतोष घोलप, अमोल चासकर, स्वप्निल लोहार, सागर शिंगाडे, सदाशिव मल्ले, संदीप लांडे, बाळकृष्ण साबळे, संतोष शिंदे, सोमनाथ गव्हाणे, यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे सुपा पो स्टे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment