बापरे..बारामतीत पेट्रोल पंपानजीक एकावर कोयत्याने हल्ला..
बारामती:- बारामती एमआयडीसी भिगवण रोडनजीक रुई पाटी समोरील खरेदी विक्री संघाच्या पेट्रोलपंपानजीक मारहाणीचा प्रकार घडला आहे.पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एकाला काहींनी मारहाण करत बाहेर आणून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना नुकताच घडली आहे.या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. बारामती एमआयडीसीत असलेल्या बारामती खरेदी
विक्री संघाच्या पेट्रोलपंपावर एकजण पेट्रोल
भरण्यासाठी आला होता. त्यावेळी काहीजण त्या
ठिकाणी आले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला
मारहाण करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीला
मारहाण करत पेट्रोलपंपाबाहेर आणून त्याच्यावर
कोयत्याने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.संध्याकाळी हा प्रकार घडला असून या अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असले तरी मात्र या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून,पूर्वी देखील असाच पेट्रोल पंपावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती.
No comments:
Post a Comment