माळेगाव बुद्रुक येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आरोग्य शिबिर संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 9, 2025

माळेगाव बुद्रुक येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आरोग्य शिबिर संपन्न..

माळेगाव बुद्रुक येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आरोग्य शिबिर संपन्न..
बारामती:- बारामती तालुक्यातील माळेगाव येथे डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
आरोग्य शिबिर माळेगाव बुद्रुक येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले, शालेय विद्यार्थी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांच्यात विविध शारीरिक समस्या निर्माण होत आहे आरोग्याच्या अशा प्रकारच्या समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय  विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य कसे जपावे यासाठी डॉ. सुनील पवार यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना माळेगाव बुद्रुक येथील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ सुनील पवार बोलत होते. यावेळी शिबिराचे उद्घाटन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन
विद्यालयाच्या प्रिन्सिपल माऊ घोष व विद्यालयाच्या उपशिक्षिका पौर्णिमा पवार यांनी केले होते.उद्घाटनानंतर प्रमोद जाधव यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगून विद्यालया मार्फत विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच शिबिरामध्ये बारामती येथील पवार हॉस्पिटलच्या वतीने विद्यार्थ्यांची रक्तातील साखरेचे प्रमाण, ब्लड प्रेशर, ईसीजी,थायरॉईड, इत्यादीची विशेष मोफत तपासणी करण्यात आली असून यामध्ये डॉ. अमोल माने, डॉ,स्नेहा जगताप, डॉ. वैभव यादव, यांनी सहभाग घेऊन औषधोपचार केले. तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉ.ऋचा पवार यांनी विद्यालयातील शिक्षिका तसेच मुलींची तपासणी करून त्यांना विशेष मार्गदर्शन केले. माळेगाव येथील दंतरोग तज्ञ डॉ. रोहन दोषी यांनी विद्यार्थ्यांनी दातांची काळजी व निगा कशी
घ्यावी यावर मार्गदर्शन करून तपासणी केली. तपासणी वेळी डॉक्टरांना मयूर उंडे, संग्राम जाधव,साजिद कांबळे, मयूर ढालपे, पूजा इंगळे यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी होण्याकरिता
विद्यालयाच्या उपशिक्षिका पौर्णिमा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील शिक्षक,शिक्षीका, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment